आठवणी २०११ वर्ल्डकपच्या; सचिनसाठी संघाने गायलं होतं गाणं !

टीम ई सकाळ
Sunday, 22 December 2019

  • सचिन तेंडुलकरने शेअर केल्या ड्रेसिंगरुममधल्या आठवणी
  • २०११ला वर्ल्डकप जिंकल्यानंतर खेळाडूंनी त्याच्यासाठी गायले होतं गाणं

नवी दिल्‍ली: २०११मध्ये भारतीय क्रिकेट संघाने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २८ वर्षानंतर वर्ल्‍ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती. मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाने वर्ल्‍ड कप जिंकल्यानंतरची ड्रेसिंग रूममधील एक आठवण शेअर केली आहे. त्याने सांगितले की, तो युवराज सिंगला मिठी मारल्यानंतर रडला होता. त्यासोबतच ड्रेसिंगरुममधील अन्य सहकाऱ्यांनी त्याच्यासाठी 'तुझमें रब दिखता है' हे गाणेही गायले होते.

तर माझा पुतळा जाळा, पण... : पंतप्रधान मोदी

सचिनने इंडिया टुडेच्या 'इंस्पिरेशन' कार्यक्रमात बोलताना या आठवणी शेअर केल्या आहेत. महेंद्र सिंह धोनीने सिक्सर मारून भारताला विजयी केल्यावर संघातील सर्व सहकारी हे मैदानकडे धावत सुटले. पुढे सचिनने सांगितले की, जेंव्हा मी युवराजला मिठी मारली तेव्हा मला रडू आवरत नव्हते आणि मी रडू लागलो. त्यावेळी मी युवराजला म्हटले की, हाच तो क्षण आहे ज्यासाठी मी क्रिकेट खेळायला सुरवात केली होती. तेव्हा संघातील सर्व खेळाडू आणि सहकारी हे आंनद साजरा करण्यात व्यस्त होते. एकही दरवाजा बंद नव्हता. सर्वजण एखाद्या उत्सवाप्रमाणे आपला आनंद साजरा करत होते. प्रत्येक रुममध्ये शैंपेन फोडून आनंद साजरा करण्यात येत होता. जोरात गाणी चालू होती. मी कधीही डांस करत नाही, परंतु त्यावेळी मीही डांस केला होता, सोबत पत्नी अंजलीनेही डांस केला असल्याची आठवण सचिनने सांगितली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझ्यासाठी यावेळी सहकाऱ्यांनी गाणं गायलं आणि भरून आले असेही सचिनने सांगितले आहे. सचिनने सांगितले की, भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी त्यावळी 'तुझमें रब दिखता है' हे गाणे गायले होते. सचिन तेंडुलकरने त्याच्या करियरमध्ये एकूण 6 वर्ल्‍ड कप खेळले आहेत, आणि शेवटी त्याला वर्ल्डकपची ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली होती.

केजीएफचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर; संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत

वर्ल्‍ड कप जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरचा मोठा फॅन असलेल्या सुधीर गौतमला सचिनने ड्रेसिंगरुममध्ये बोलवून वर्ल्‍ड कप ट्रॉफी उचलण्याची संधी दिली होती. याविषयी बोलताना सचिन म्हणाला की, सुधीर गौतम हा माझा फॅन असून तो संपूर्ण भारितीयांचा प्रतिनीधी असल्याप्रमाणे तिरंगा घेऊन मैदानात वावरत असतो. तो १२५ कोटी भारतीय जनतेचा प्रतिनीधी आहे असे मला वाटते, म्हणून सर्वांच्या वतीने त्याला बोलवून त्याच्या हातात ट्रॉफी दिली होती, अशी आठवण सचिनने सांगितली.

Image result for sachin tendulkar"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin tendulkar reveals indian players sang tujhme rab dikhta hai after 2011 world cup win

Tags
टॉपिकस