भारतीय गोलंदाजी आतापर्यंतची सर्वोत्तम: सचिन तेंडुलकर

वृत्तसंस्था
Tuesday, 26 June 2018

2019 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडकाची पूर्वतयारी असे मानल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातील गोलंदाज आतापर्यंतचे सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. सचिनने असे वक्तव्य करून गोलंदाजांचे मनोधैर्य उंचावले आहे.

नवी दिल्ली : 2019 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडकाची पूर्वतयारी असे मानल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातील गोलंदाज आतापर्यंतचे सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. सचिनने असे वक्तव्य करून गोलंदाजांचे मनोधैर्य उंचावले आहे.

सचिन तेंडुलकरच्या मते इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघ खूप वर्षांनंतर सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमणासह मैदानावर उतरेल. भारताकडे सध्या सर्वोत्तम जलद गोलंदाजांचे आक्रमण आहे जे त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत कधीच पाहिले नसल्याचा दावा सचिनने केला आहे.

भारत उद्यापासून (27जून) आयर्लंडविरुद्ध दोन ट्वेंटी सामने खेळणार आहे. मात्र सगळ्यांच्या नजरा एक ऑगस्टपासून बर्मिंघममध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांवर असतील. याविषयी बोलताना सचिन म्हणाला, "भारतीय संघात यापूर्वीही अनेक उत्तम गोलंदाज होते मात्र गोलंदाजीतील एवढी विविधता भारतीय संघात याआधी कधाही नव्हती. सध्या भारतीय संघात एक स्विंग गोलंदाज (भुवनेश्वर कुमार), एक उंच गोलंदाज (इशांत शर्मा), एक अचूक गोलंदाज (जसप्रीत बुमराह) आणि 140 किमी पेक्षाही जास्त वोगाने गोलंदाजी करु शकणारा गोलंदाज (उमेश यादव), असे विविध जलदगती गोलंदाज आहेत.

भुवनेश्वर आणि हार्दिक पांड्याबद्दल बोलताना सचिन म्हणाला, ''भारतीय संघ फलंदाजी करु शकणाऱ्या गोलंदाजांच्या शोधात असतानाच या दोघांनी वेळोवेळो फलंदाजीमध्ये योगदान दिले आहे. भुवनेश्वर कुमारमुळे भारतीय संघात सकारात्मक समतोल साधला गेला आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar talks about Indian bowlers