'सचिनकडून दादाला दादागिरी करण्याच्या शुभेच्छा'

Sunday, 8 July 2018

आज भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा वाढदिवस आहे. त्याबद्दल गांगुलीला म्हणजेच सर्वांच्या लाडक्या दादाला सचिन, सेहवागसह अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरने तर दादाला त्याच्या मातृभाषेतून म्हणजेच बंगालीतून ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. 'दादा आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त तुम्हाला सदैव दादागिरी करण्याची ताकद येवो, वाढदिवसाच्या शुभेच्छा' अशा आशयाचे ट्विट करून सचिनने दादाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई- आज भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा वाढदिवस आहे. त्याबद्दल गांगुलीला म्हणजेच सर्वांच्या लाडक्या दादाला सचिन, सेहवागसह अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडुलकरने तर दादाला त्याच्या मातृभाषेतून म्हणजेच बंगालीतून ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. 'दादा आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त तुम्हाला सदैव दादागिरी करण्याची ताकद येवो, वाढदिवसाच्या शुभेच्छा' अशा आशयाचे ट्विट करून सचिनने दादाला शुभेच्छा दिल्या आहेत.

विरेंद्र सेहवागनेही दादाला ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर, लोकेश राहुल, विराट कोहली, प्रग्यान ओझा, मोहम्मद कैफ, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, यांनीही दादाला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, सौरभ गांगुली (जन्म जुलै 8, इ.स.1972) भारताकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू. सौरव गांगुली नावापेक्षा जास्त दादा या नावानेच गांगुलीची खरी ओळख. सौरव गांगुली डाव्या हाताने फलंदाजी तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा खेळाडू. गांगुलीने भारताकडून 100 पेक्षा जास्त कसोटी सामने तर 300 पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत.

गांगुलीने भारताकडून 113 कसोटी सामन्यामधून 42.17 च्या सरासरीने आणि 16 शतकांच्या मदतीने 7212 धावा केल्या आहेत. तर, 311 एकदिवसीय सामन्यात 41.02 च्या सरासरीने आणि 22 शतकांच्या मदतीने 11363 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, गोलंदाजीत गांगुलीने कसोटी सामन्यात 32 तर एकदिवसीय सामन्यात 100 बळींचा आकडा पूर्ण केला आहे. एकदिवसीय सामन्यात 10000 धावांचा टप्पा पार करणारा गांगुली हा जगातील जगातील सातवा तर भारताचा सचिन तेंडुलकरनंतर दुसरा खेळाडू आहे. याशिवाय गांगुलीने 2000-2005 दरम्यान भारतीय संघाचे नेतृत्व केले. सौरभ गांगुलीच्या कार्यकाळात भारतीय चांगल्या पर्वाला सुरवात झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin tendulkar tweet on saurabh ganguly birthday