esakal | सचिनकडून सेहवागला 'उलटे' ट्विट करून शुभेच्छा
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar, Virendra Sehwag

''वाढदिवसाच्या शुभेच्छा, विरु! नवीन वर्ष तुला चांगले जावे. तु मैदानावर नेहमीच मी सांगितलेल्या गोष्टींच्या विरुद्ध केलेले आहेस. त्यामुळे तुला माझ्याकडुन तुला येथे अशाप्रकारे शुभेच्छा.'' अशा आशयाचे ट्विट करुन सचिन तेंडुलकरने सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

सचिनकडून सेहवागला 'उलटे' ट्विट करून शुभेच्छा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - वीरेंद्र सेहवाग हा टोमणे मारुन सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात प्रसिद्ध आहे. पण आता त्याच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त त्याचा सलामीचा जोडीदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्याच पावलावर पाऊल ठेऊन उलटे ट्विट करुन शुभेच्छा दि्ल्या आहेत.

''वाढदिवसाच्या शुभेच्छा, विरु! नवीन वर्ष तुला चांगले जावे. तु मैदानावर नेहमीच मी सांगितलेल्या गोष्टींच्या विरुद्ध केलेले आहेस. त्यामुळे तुला माझ्याकडुन तुला येथे अशाप्रकारे शुभेच्छा.'' अशा आशयाचे ट्विट करुन सचिन तेंडुलकरने सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

सेहवाग त्याच्या आक्रमक शैलीमुळे तो एक धोकादायक फलंदाज बनला होता. त्याने बनवलेल्या दोन त्रिशतकामुळे तो प्रख्यात फलंदाज ब्रायन लारा आणि सर डॅान ब्रॅडमन यांच्या यादीत त्याचे नाव गणले जाऊ लागले होते. तसेच त्याने एकदिवसीय सामन्यात सुद्धा वेस्ट विंडीज संघाविरुद्ध द्विशतक केले होते.

loading image