सचिनने हरभजनला दिल्या तमिळमधून शुभेच्छा

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगचा आज 38 वा वाढदिवस असून, त्यानिमित्त विविध स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याला खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने त्याच्या ट्विटरवरून त्याचा आणि हरभजनचा फोटो टाकत तमिळ भाषेत ''वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅव व ब्लास्ट'' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 

तसेच नेहमी अनोख्या पद्धतीने ट्विट करण्यासाठी प्रसिद्ध असलेला भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग यानेही ''आमच्या भजीची चटणी आणि प्रत्येक जागेचा जीव असलेला हरभजन, तुला वाढदिसाच्या खूप शुभेच्छा'' असे ट्विट केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin wishes Harbhajan on his birthday