स्कॉटलंडचा बलाढ्य इंग्लंडला धक्का 

वृत्तसंस्था
Tuesday, 12 June 2018

क्रिकेट इतिहासात ठामपणे पाऊल टाकण्यास सज्ज असलेल्या स्कॉटलंडने रविवारी ऐतिहासिक विजयाची नोंद करताना एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अव्वल मानांकित इंग्लंडला धक्का दिला.

एडिनबर्ग - क्रिकेट इतिहासात ठामपणे पाऊल टाकण्यास सज्ज असलेल्या स्कॉटलंडने रविवारी ऐतिहासिक विजयाची नोंद करताना एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अव्वल मानांकित इंग्लंडला धक्का दिला.

कॅलम मॅकलोड्‌सच्या नाबाद 103 धावांच्या खेळीच्या जोरावर स्कॉटलंडने 5 बाद 371 धावांची मजल मारली. काईल कोएत्झर (58) आणि जॉर्ज मन्सी (55) यांची त्याला साथ मिळाली. इंग्लंडने आव्हानास उत्तर देताना जोरदार प्रत्युत्तर दिले. जॉनी बेअरस्टॉने 105 धावांची खेळी केली. ऍलेक्‍स हेल्स आणि मोईन अली यांनीही आक्रमक फलंदाजी केली. पण, इंग्लंडचा डाव 48.5 षटकांत 365 धावांत आटोपला.

स्कॉटलंडच्या मार्क वॅटने 55 धावांत 3, तर अलसेडर इव्हान्स, रिची बेरिंग्टन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scotland beat England in international cricket