किवींनी रोखले; भारत दिवस अखेर 291/9

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

कानपूर - कसोटी कारकिर्दीतील 500 वा सामना खेळत असलेल्या 
भारताने आज (गुरुवार) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 9 बाद 291 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून आता अष्टपैलु खेळाडू रवींद्र जडेजा (16 धवा - 18 चेंडू) आणि उमेश यादव (8 धावा - 11 चेंडू) ही अखेरची जोडी खेळत असून उद्या भारताची धावसंख्या आणखी किती वाढेल, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

या सामन्यात एका क्षणी 1 बाद 154 अशा भक्‍कम अवस्थेत असलेल्या भारतीय फलंदाजीस नंतर भगदाड पडले; आणि नियमित अंतराने फलंदाज बाद होत राहिले. सलामीवीर मुरली विजय (65 धावा - 170 चेंडू) आणि चेतेश्‍वर पुजारा (62 धावा - 109 चेंडू) यांनी केलेल्या शतकी भागीदारीनंतर रोहित शर्मा (35 धावा - 67 चेंडू) व रवीचंद्रन आश्‍विन (40 धावा - 76 चेंडू) यांनी केलेल्या छोटेखानी खेळींमुळे भारताच्या डावास आकार आला. न्यूझीलंडच्या पाचही गोलदाजांनी किमान एकेक बळी मिळवित भारतास रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. न्यूझीलंडचे डावखुरे गोलंदाज ट्रेंट बोल्ट व मिशेल सॅंटनर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवित भरीव योगदान दिले. 
 
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोसमातील 13 कसोटींच्या मालिकेस यशस्वी सुरवात करण्यासाठी फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीची साथ भारतीय संघास मिळणार असेच दिसत आहे. चौकार मारुन डावाची सुरवात करणाऱ्या के. एल. राहुलला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले अन् तो 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराच्या साथीने मुरली विजयने डाव संभाऴत धावसंख्या शतकाच्या पार नेली. 

लंचनंतर या दोघांनी आणखी सावधपणे खेळत संघाची धावसंख्या दीडशेच्या पार नेली. तसेच या दोघांनी शतकी भागीदारीही नोंदविली. अखेर 62 धावांवर असताना पुजारा सँटनरचा शिकार ठरला. त्यापाठोपाठ कोहलीही कमाल दाखवू शकला नाही आणि अवघ्या 9 धावांवर ईश सोधीचा शिकार ठरला. मुरली विजयही 65 धावांवर बाद झाल्याने भारताची स्थिती 4 बाद 185 अशी झाली. चहापानानंतर भारताला रहाणेच्या रुपाने आणखी एक धक्का बसला. रहाणे 18 धावांवर मार्क क्रेगच्या गोलंदाजीवर बाद झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the second half of the Indian team