63 चेंडूंत शतक झळकाविल्यावर ख्रिस गेल म्हणाला, 'थँक्‍यू सेहवाग!' 

वृत्तसंस्था
Friday, 20 April 2018

नवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर चक्क वीरेंद्र सेहवागचे आभार मानले. कारण, यंदाच्या 'आयपीएल'पूर्वी झालेल्या लिलावामध्ये ख्रिस गेलला कोणत्याही संघाने करारबद्ध करण्यास उत्सुकता दर्शविली नव्हती. किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटॉर असलेल्या सेहवागच्या आग्रहावरून संघ व्यवस्थापनाने लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात गेलला करारबद्ध केले. 

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गेलने काल 63 चेंडूंत नाबाद 104 धावा फटकाविल्या. 'आयपीएल'च्या गेल्या पर्वात गेल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघात होता. आतापर्यंतच्या सर्व आयपीएलमध्ये मिळून गेलने एकूण 91 सामन्यांत 3420 धावा फटकाविल्या आहेत. पण बंगळूरच्या संघानेही गेलला पुन्हा संघात स्थान देण्यास उत्सुकता दर्शविली नव्हती आणि लिलावामध्येही इतर कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. 

सेहवागच्या आग्रहामुळे पंजाब संघाने गेलला संधी दिली. कालच्या सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीमध्ये गेलने या घटनेचा उल्लेख केला. "मला संधी देऊन 'आयपीएल' वाचविल्याबद्दल मी सेहवागचे आभारच मानतो', असे गेल म्हणाला. 

यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या दोन सामन्यांत गेलला संधी मिळाली नव्हती. तिसऱ्या सामन्यात गेलला संधी मिळाली आणि त्याने 33 चेंडूंत 63 धावा फटकाविल्या. त्यानंतर कालच्या सामन्यातही त्याने सर्वच गोलंदाजांची धुलाई केली. गेलने आतापर्यंत सर्व ट्‌वेंटी-20 स्पर्धांमध्ये मिळून 21 शतके झळकाविली आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sehwag saved the IPL by picking me says Chris Gayle