धोनीला निवृत्त करण्याची निवड समितीला घाई

वृत्तसंस्था
Monday, 15 July 2019

विश्‍वकरंडकानंतर धोनी निवृत्त होईल असे स्पर्धेदरम्यानच सांगण्यात आले. प्रत्यक्षात तसे काही घडलेले नाही. धोनीच्या निवृत्तीची निवड समितीलाच आता घाई झाली आहे. इथून पुढे संघ निवडताना धोनीला पहिली पसंती नसेल, असे सांगून त्याने धोनीला जणूू निवृत्त घेण्याचे आदेशच दिले आहेत. 
 

नवी दिल्ली ः विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवाचे कारण देण्यासाठी लवकरच कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री प्रशासक समितीची भेट घेतील. पण, तोवर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीचे काय? ही चर्चा अजून संपलेली नाही.

विश्‍वकरंडकानंतर धोनी निवृत्त होईल असे स्पर्धेदरम्यानच सांगण्यात आले. प्रत्यक्षात तसे काही घडलेले नाही. धोनीच्या निवृत्तीची निवड समितीलाच आता घाई झाली आहे. इथून पुढे संघ निवडताना धोनीला पहिली पसंती नसेल, असे सांगून त्याने धोनीला जणूू निवृत्त घेण्याचे आदेशच दिले आहेत. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धे दरम्यान "बीसीसीआय'ने विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात येईल, तो धोनीचा अखेरचा सामना असेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात भारतीय खेळाडू मायदेशी आल्यानंतरही अजून धोनीने काही निर्णय घेतलेला नाही. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील धोनीची संथ फलंदाजी अनेकांच्या डोळ्यावर आली आहे. या संदर्भात निवड समिती अध्यक्ष प्रसाद धोनीची भेट घेणार असल्याचे समजते. 

विश्‍वसनीय सुत्रांनुसार धोनीची कारकिर्द संपु÷ष्टात आल्यात जमा आहे. निवड समिती अध्यक्ष एम. एस.के. प्रसाद यांनी तर यापुढे संघ निवडताना धोनीला पहिले प्राधान्य नसेल असे स्पष्टच केले आहे. आम्हाला पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्‍वकरंडकासाठी संघ बांधायचा आहे. त्याची सुरवात आम्ही आतापासून करणार आहोत, असे प्रसाद यांचे म्हणणे पडल्याचे समजते.

"धोनीने अजून निवृत्ती जाहीर केली नाही याचे आम्हाला आश्‍चर्य वाटते. रिषभ पंतसारखे अनेक युवा खेळाडू त्याची जागा घेण्यासाठी सज्ज आहेत.विश्‍वकरंडक स्पर्धेत धोनीच्या फलंदाजीत ती जिगर राहिली नसल्याचे दिसून आले आहे. कुठल्याही क्रमांकावर खेळला, तरी तो डावाला वेग देऊ शकला नाही, असे निवड समितीचे म्हणणे असल्याचे "बीसीसीआय'च्या एका विश्‍वसनीय सुत्राने सांगितले. त्यामुळे आता धोनी आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी आपली निवृत्ती जाहीर करतो का हे येत्या एक दोन दिवसांतच स्पष्ट होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: selection committee wants MS Dhoni to retire