शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

आफ्रिदीने 1996 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 37 चेंडूत शतक झळकाविण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याचा हा विक्रम 17 वर्षे अबाधित होता.

इस्लामाबाद - पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

आक्रमक फलंदाजी आणि उंच फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिदीने यापूर्वीच 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमधून आणि 2015 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने आपली 21 वर्षांची क्रिकेट कारकिर्दी थांबविण्याचा निर्णय घेतला. आफ्रिदीने या महिन्याच्या सुरवातीलाच निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते. जगभरातील लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे आफ्रिदी म्हणाला होता.

आफ्रिदीने 1996 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 37 चेंडूत शतक झळकाविण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याचा हा विक्रम 17 वर्षे अबाधित होता. आफ्रिदीने 398 एकदिवसीय सामन्यांत 8064 धावा आणि 395 बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याची ओळख अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून होती. 

Web Title: Shahid Afridi announces retirement from international cricket