फिक्‍सिंगच्या आरोपावरून मियॉंदाद-आफ्रिदीमध्ये जुंपली

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 ऑक्टोबर 2016

कराची - पाकिस्तानी संघात एकत्र खेळतानाही काही खेळाडूंचे कधीच जमले नाही. दोन वेगवेगळ्या युगांत खेळले असले तरी काही खेळाडू एकमेकांच्या विरोधात कायम राहिले आहेत. जावेद मियॉंदाद आणि शाहिद आफ्रिदी हे माजी कर्णधार आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. 

मॅच फिक्‍सिंगचे आरोप केल्यामुळे आफ्रिदी मियॉंदाद यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. मियॉंदाद नेहमीच पैशासाठी हापापले होते, त्यामुळे विश्‍वकरंडक विजेता कर्णधार इम्रान खान आणि त्यांच्यामध्ये उभा वाद होता, अशा शब्दांत आफ्रिदीने मियॉंदाद यांना फटकारले आहे. 

निमित्त होते पाकिस्तानी पत्रकाराच्या पुस्तकाच्या अनावरणाचे. त्या समारंभानंतर आफ्रिदीने मियॉंदाद यांचा समाचार घेण्यास सुरवात केली. आफ्रिदीने त्याच्या मुलीची शपथ घ्यावी आणि त्याने सामने विकले नाहीत हे सांगावे, असे मी त्याला आव्हान देतो, असे मियॉंदाद म्हणतात. मियॉंदाद यांनी आरोप केलेली चित्रफीत आफ्रिदी आणि त्याचे वकील बारकाईने पाहात आहेत. मोहरमची सुटी संपल्यानंतर ते मियॉंदादला कायदेशीर नोटीस पाठविणार आहेत. 

वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेतून आपल्याला निवृत्ती घ्यायची आहे, अशी मागणी आफ्रिदीने गेल्या महिन्यात केली होती. या मालिकेत पाकिस्तानने निर्भेळ यशही मिळविले होते. निवृत्तीचा सामना खेळायला मिळणे हा माझा हक्क आहे. तशी मागणी त्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली आहे. पाकिस्तान मंडळही त्याला निरोपाचा सामना खेळायला देण्याचा विचार करीत आहे. 

भारतातील टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर आफ्रिदीने कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर निवृत्तीचेही संकेत दिले होते. प्रत्यक्षात मात्र अजून तसा कोणता निर्णय घेतलेला नाही. 

Web Title: Shahid Afridi to take legal action against Javed Miandad on cricket match fixing allegation