भारतीय क्रिकेट संघाकडून आफ्रिदीला अनोखी भेट

पीटीआय
बुधवार, 19 एप्रिल 2017

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध कितीही तणावग्रस्त असले, तरी क्रीडा क्षेत्रात अनेक द्विपक्षीय खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याची प्रचिती भारतीय क्रिकेट संघाच्या कृतीतून समोर आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला भारतीय क्रिकेट संघाने अनोखी भेट दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंच्या सह्या असलेली विराट कोहलीची जर्सी त्यांनी आफ्रिदीला भेट म्हणून पाठवली आहे. ‘शाहिद भाई, शुभेच्छा! तुझ्याविरुद्ध खेळताना नेहमीच क्रिकेटचा आनंद मिळाला,’ असा संदेशही या जर्सीवर लिहिण्यात आला आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने ट्‌विटरच्या माध्यमातून या जर्सीचा फोटो प्रसिद्ध केल्यापासून या भेटीची चर्चा सुरू झाली. आफ्रिदीला या वर्षी होणाऱ्या ‘आयसीसी’ अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी हरभजन, हबिबूल बशर, इयान बेल, शेन बाँड, माईक हसी, कुमार संगकारा आणि ग्रॅमी स्मिथ यांच्यासह राजदूत म्हणून निवडण्यात आले आहे.

Web Title: Shahid Afridi unique gift