अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत शकिब अल हसन बांगलादेशचा कर्णधार

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

पुढील महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शकिब उल हसन बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर फलंदाज मोसाडेक हुसेन याला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे. एक वर्षानंतर त्याला संघात स्थान मिळाले आहे. या मालिकेसाठी इम्रून कायेसला वगळण्यात आले आहे. मेहदी हसन जखमी असल्यामुळे मोसाडेकचा गोलंदाजीतही फायदा होऊ शकेल, असे बांगलादेश निवड समितीने म्हटले आहे.
 

ढाका - पुढील महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी शकिब उल हसन बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर फलंदाज मोसाडेक हुसेन याला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे. एक वर्षानंतर त्याला संघात स्थान मिळाले आहे. या मालिकेसाठी इम्रून कायेसला वगळण्यात आले आहे. मेहदी हसन जखमी असल्यामुळे मोसाडेकचा गोलंदाजीतही फायदा होऊ शकेल, असे बांगलादेश निवड समितीने म्हटले आहे.

टस्किन अहमद आणि यष्टिरक्षक नुरुल हसन यांनाही वगळण्यात आले आहे. तीन सामन्यांची मालिका भारतात डेहराडून येथे 3 ते 7 जूनदरम्यान होणार आहे. संघ ः शकिब अल हसन (कर्णधार), महमुदुल्ला रियाद, तामिम इक्‍बाल, सौम्या सरकार, लिटॉन दास, मुशफीकुर रहिम, शब्बीर रहमान, मोसाडेक हुसेन, अरिफुल हक, मेहेदी हसन, नझमुल इस्लाम, मस्तफीझूर रहमान, अबु हैदर, रुबेल हुसेन, अबू जायेद. 

Web Title: Shakib Al Hasan is Bangladesh's captain in the series against Afghanistan