'आयपीएल ही शरद पवारांची देणगी'

पीटीआय
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - आयपीएल ही जगातील सर्वांत मोठी क्रिकेट लीग आहे. दहा वर्षांत ती सर्वोत्तम लीग झाली आहे, ही लीग शरद पवारांनी क्रिकेटजगतास दिली, असे सुनील गावसकर यांनी शरद पवार यांचा गौरव करताना सांगितले.

मुंबई - आयपीएल ही जगातील सर्वांत मोठी क्रिकेट लीग आहे. दहा वर्षांत ती सर्वोत्तम लीग झाली आहे, ही लीग शरद पवारांनी क्रिकेटजगतास दिली, असे सुनील गावसकर यांनी शरद पवार यांचा गौरव करताना सांगितले.

पवार यांना नुकतेच भारत सरकारने पद्मविभूषण देऊन गौरवले. त्यानिमित्ताने त्यांचा मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास मुंबईचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. मुंबई क्रिकेट संघटनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. या वेळी गावसकर म्हणाले, ‘‘पवार हे जबाबदारी वाटून देतात, हे त्यांच्याशी संबंध आला ते जाणतात. आयपीएलची जबाबदारी पवार यांनी ललित मोदी यांच्यावर सोपवली होती. क्रिकेट हे एक करिअर झाले आहे, त्यास कारणही आयपीएल आहे.’’ 

आयसीसीचा अध्यक्ष असताना मुंबईत विश्वकरंडकाचा अंतिम सामना आयोजित करू शकलो हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदी क्षण आहे, असे पवार यांनी या वेळी सांगितले. या मुंबई संघटनेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अनेक चांगले सहकारी लाभले, त्यामुळेच खूप काही करू शकलो, असेही पवार यांनी सांगितले. लोढा समितीने एक राज्य-एक मत हा निर्णय अमलात आणण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी माझी झोप उडाली, असे पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर मी कधीही कोणत्याही खेळाडूंची शिफारस केली नाही. नियमांमध्ये लक्ष घातले नाही. मी फक्त खेळ आणि पायाभूत सुविधा या गोष्टींवर भर दिला, असे पवार यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Sharad Pawar was honored by the Mumbai Cricket Association