जसप्रित बुमराहला दुखापत, शार्दुल ठाकूरला संधी

वृत्तसंस्था
Friday, 6 July 2018

नवी दिल्ली : भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील ट्वेंटी20 मालिकेला मुकल्यानंतर आता जसप्रित बुमराहला एकदिवसीय मालिकेतूनही माघार घ्यावी लागणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (शुक्रवार) सांगितले. बुमराहला मायदेशी परतावे लागल्याने त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान मिळाले आहे. 

निवड समितीने सर्वमताने शार्दुलचे नाव सुचविले. आर्यलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी सामन्यात बुमराहच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. 4 जुलैला बुमराहच्या अंगठ्यावर शस्त्रक्रीया झाली असून तो भारतात परतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. आता बुमराहच्या तंदुरुस्तीवर वैद्यकीय पथक बारिक नजर ठेवून असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shardul to replace injured Bumrah in England ODIs