मनोहर यांचे आहे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

दुबई - ‘बीसीसीआय’मध्ये घडणाऱ्या घडामोडींवर ‘आयसीसी’चे अध्यक्ष शशांक मनोहर लक्ष ठेवून आहेत. आधीच ताकदवान असणाऱ्या ‘बीसीसीआय’मुळे क्रिकेटला नेहमीच फायदा झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘बीसीसीआय’चे यापूर्वी दोनदा अध्यक्ष राहिलेले शशांक मनोहर यांनी ‘आयसीसी’च्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयसीसी’च्या अधिकृत संकेतस्थळावर लिहिलेल्या स्तंभातून आपले विचार मांडले आहेत.

‘बीसीसीआय’वर सध्या प्रशासक समितीची नियुक्ती असून, ‘आयसीसी’च्या बैठकीस त्यांचे तीन सदस्य उपस्थित राहणार आहेत. मनोहर म्हणाले, ‘‘बीसीसीआयमध्ये घडणाऱ्या घटनांवर मी लक्ष ठेवून आहे. बीसीसीआय नेहमीच आयसीसीचा महत्त्वपूर्ण घटक राहिले आहे. भक्कम पायावर उभे असलेल्या ‘बीसीसीआय’मुळे क्रिकेटला नेहमीच फायदा झाला आहे.’’

सर्वांना समान हक्क
‘आयसीसी’शी संलग्न असणाऱ्या सर्व सदस्यांना भक्कम पाठिंबा, आर्थिक मदत, सहकार्य आणि क्रिकेट सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे उद्दिष्ट आहे. मोठ्या देशांसह छोट्या देशांनाही  दीर्घकालीन फायदा मिळावा असेच निर्णय माझ्याकडून घेतले जातील, असेही मनोहर यांनी स्तंभात म्हटले आहे. 

घटनादुरुस्तीचे पुनर्वालोकन
मनोहर यांनी स्तंभातून घटनादुरुस्तीविषयी देखील मते मांडली आहेत. ‘‘घटनेत करावयाच्या बदलासाठी २०१४ रोजी  झालेल्या निर्णयाचे पुनर्वालोकन करण्याचा निर्णय मी घेतला असून, यासाठी काही व्यक्तींची नियुक्तीदेखील केली आहे. या व्यक्ती आपली मते या आठवड्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत मांडतील आणि त्यानंतर पुढील पावले उचलण्यासाठी आपण सहकाऱ्यांबरोबर चर्चा करू,’’ असे त्यांनी लिहिले आहे. 

त्याची जबाबदारी मंडळांचीच
मनोहर यांनी या स्तंभातून द्विपक्षीय मालिकेविषयीदेखील आपली मते स्पष्टपणे मांडली. ते म्हणतात, ‘‘द्विपक्षीय मालिकांचा निर्णय हा पूर्णपणे संबंधित देशांच्या क्रिकेट मंडळांनीच घ्यायचा आहे. आयसीसी त्यात हस्तक्षेप करणार नाही. द्विपक्षीय मालिकांचे अधिकार कधीच आयसीसीचे नसतात. त्यामुळे आम्ही सदस्यांवर द्विपक्षीय मालिका खेळण्याचे बंधन घालू शकत नाही. यासाठी आता आम्ही क्रिकेट मंडळांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करू.’’

मनोहर यांच्या या वक्तव्याने ‘आयसीसी’ने कधीच भारत किंवा पाकिस्तान यांना द्विपक्षीय मालिका खेळण्यास बंधनकारक केले नव्हते, हे स्पष्ट होते.

Web Title: shashank manohar watch on bcci