मैदानात जडेजा, प्लेसिसवर फेकला बूट

वृत्तसंस्था
Wednesday, 11 April 2018

कोलकताचा संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकामध्ये हा प्रकार घडला. रवींद्र जडेजाला लक्ष्य करुन एका जोडप्याने बूट मैदानात फेकले. जडेजाने हा बूट पायाने बाहेर फेकला.

चेन्नई : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान प्रेक्षकाने चेन्नईचा खेळाडू रवींद्र जडेजा आणि फाफ डू प्लेसिस यांच्यावर बूट फेकल्याची घटना घडली. 

कोलकताचा संघ फलंदाजी करत असताना आठव्या षटकामध्ये हा प्रकार घडला. रवींद्र जडेजाला लक्ष्य करुन एका जोडप्याने बूट मैदानात फेकले. जडेजाने हा बूट पायाने बाहेर फेकला. त्यावेळी सीमारेषेवर असलेल्या फाफ डू प्लेसिस याच्यावरही बूट फेकण्यात आला. पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.

कावेरी पाणीवाटप प्रश्नावरून सामन्यापूर्वी मैदानाबाहेर विविध पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कावेरी प्रबंधन बोर्ड (सीएमबी) आणि कावेरी जल नियामक समितीचं (सीडब्ल्यूआरसी) गठन न करण्याची मागणी करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती. सुपरस्टार रजनीकांतने देखील चेन्नईच्या टीमला आंदोलनाला पाठिंबा देण्याचासाठी मागणी केली होती. पण, सामना सुरु झाल्याने हे कृत्य करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shoes hurled at CSK's Jadeja, Du Plessis