जखमी असूनही मॉर्गन इंग्लंडचा "वन-डे' कर्णधार

वृत्तसंस्था
Thursday, 31 May 2018

जखमी असूनही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इऑन मॉर्गनची इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे.

 लंडन - जखमी असूनही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इऑन मॉर्गनची इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे. इंग्लंडने आज स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर केले. स्कॉटलंडविरुद्ध जोस बटलरला विश्रांती दिली असली तरी, त्याच्यासह वेगवान गोलंदाज टॉम क्‍युरनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी देण्यात आली आहे.

संघ - (स्कॉटलंडविरुद्ध) मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टॉ, सॅम बिलिंग्ज, ऍलेक्‍स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, ज्यो रूट, बेन स्टोक्‍स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्‍स, मार्क वूड (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) ः मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, बेअरस्टॉ, जोस बटलर, टॉम क्‍युरन, हेल्स, प्लंकेट, रशिद, रूट, रॉय, स्टोक्‍स, विली, वोक्‍स, वूड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Skipper Eoin Morgan Included in 14-Man ODI Squad Despite Injury