स्मिथ, वॉर्नरला खेळण्याची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 May 2018

सिडनी - चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाची बंदी लादण्यात आलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीच्या कालावधीत श्रेणी (ग्रेड) क्रिकेट सामने खेळण्यास परवानगी दिली आहे. 

सिडनी - चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाची बंदी लादण्यात आलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीच्या कालावधीत श्रेणी (ग्रेड) क्रिकेट सामने खेळण्यास परवानगी दिली आहे. 

याच प्रकरणात नऊ महिन्यांची बंदी लादण्यात आलेल्या कॅमेरुन बॅंक्रॉफ्टबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया सोमवारी (ता. १४) वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील प्रमुख क्‍लबबरोबर चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर बॅंक्रॉफ्टबाबत निर्णय होईल, असे मानले जाते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणानंतर या तिघांवर कारवाई करण्यात आली होती. कारवाईत तिघांनाही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या खेळाडूंना श्रेणी क्रिकेट खेळण्यास आमची हरकत नसेल, असा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला.

यानंतर न्यू साऊथ वेल्स क्रिकेट संघटनेने आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या निर्णयाच्या आड येणार नाही असे स्पष्ट करत स्मिथ आणि वॉर्नर यांना अनुक्रमे सदरलॅंड आणि रॅंडविक पिटरशाम क्‍लबकडून खेळण्याची परवानगी दिली. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेने मात्र याबाबत निर्णय राखून ठेवला आहे. विशेष म्हणजे या तीनही खेळाडूंना यापूर्वी आयपीएलमधूनही बाहेर पडावे लागले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smith and warner cricket