शास्त्री मूर्खांच्या जगात वावरतोय - गांगुली

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 जून 2016

कोलकता - रवी शास्त्रीच्या टीकेने मी व्यथित झालो आहे. तो मूर्खांच्या जगात वावरतो आहे, असे जोरदार प्रत्युत्तर सौरभ गांगुली याने दिले. 

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीची मुलाखत झाली, तेव्हा गांगुली अनुपस्थित होता. यामुळे शास्त्री संतापले. गांगुलीने मुलाखतीला आलेले उमेदवार आणि आपल्या कामाचा अनादर केल्याची टीका शास्त्रीने केली होती. 

क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) सदस्य असलेल्या गांगुलीने "दादा‘ला साजेसे प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, की "कुंबळेची नियुक्ती हा समितीचा सामूहिक निर्णय होता. शास्त्रीची टीका वैयक्तिक आहे. मला फार दुःख झाले असून मी निराश झालो आहे. त्याने आणखी थोडी परिपक्वता दाखवायला हवी होती. त्याची निवड न होण्यास मी जबाबदार आहे, असे वाटत असेल तर तो मूर्खांच्या जगात वावरतोय. तो स्वतः अशा समित्यांमध्ये दहा वर्षांहून जास्त काळ आहे. त्यामुळे त्याला जाणीव असायला हवी.‘ 
 
शास्त्री स्वतः मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. ते बॅंकॉकला सहलीसाठी गेले होते. हाच संदर्भ देत गांगुली म्हणाला, ""मलासुद्धा शास्त्रीला एक सल्ला द्यायचा आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षकपद हे एक अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यासाठी निवड होते तेव्हा शास्त्रीने समितीसमोर उपस्थित राहून सादरीकरण करायला हवे होते. बॅंकॉकमध्ये बसून कॅमेरासमोर ते करायला नको होते. कुंबळेसारखा एक महान भारतीय क्रिकेटपटू जवळपास दोन तास वेळ काढत असेल तर हे नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहे.‘‘ 

याप्रसंगी गांगुलीने कुंबळेला शुभेच्छा दिल्या. "कुंबळे हा जगातील एक सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. तो महान क्रिकेटपटू आहे,‘ असे गांगुली म्हणाला.

Web Title: Sourav Ganguly hits back at Ravi Shastri