चँपियन्स करंडकाच्या सर्वोत्तम संघाचा कर्णधार गांगुली

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

सर्वोत्तम संघ - ख्रिस गेल, हर्शल गिब्ज, सौरव गांगुली, जॅक्स कॅलिस, डेमियन मार्टीन, राहुल द्रविड (यष्टीरक्षक), शेन वॉट्सन, डॅनिएल व्हिटोरी, काईल मिल्स, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा

बंगळूर - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेस 1 जूनपासून सुरवात होत असून, त्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) निवडलेल्या सर्वोत्तम संघाच्या कर्णधारपदी सौरव गांगुलीची निवड केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चँपियन्स करंडकाचे आयोजन केले असून, त्यापूर्वी सर्वोत्तम संघ निवडण्यात येतो. या संघाच्या कर्णधारपदी गांगुलीची निवड झाली असून, या संघात राहुल द्रविड या भारतीय खेळाडूलाही स्थान देण्यात आले आहे. भारताने दोनवेळा चँपियन्स करंडक जिंकला आहे. 2002 मध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली आणि 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला होता. सोमवारी भारतीय संघाची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

इंग्लंडमध्ये 1 जूनपासून ही स्पर्धा सुरु होत असून, स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत. वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल आणि दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्ज ही सलामीची जोडी असणार आहे.

सर्वोत्तम संघ - ख्रिस गेल, हर्शल गिब्ज, सौरव गांगुली, जॅक्स कॅलिस, डॅमियन मार्टीन, राहुल द्रविड (यष्टिरक्षक), शेन वॉट्सन, डॅनिएल व्हेटोरी, काईल मिल्स, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा

Web Title: Sourav Ganguly named captain of Champions Trophy's Greatest XI