उच्चांकी धावांच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेची सरशी 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

केप टाऊन : उच्चांकी धावसंख्येच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका दरम्यान झालेल्या चौथ्या एकदिवसाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 40 धावांनी बाजी मारली. 

कारकिर्दीमधील सर्वोत्तम 185 धावांची खेळी करणाऱ्या डू प्लेसिसच्या कामगिरीने दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 367 धावांची मजल मारली. श्रीलंकेनेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर केले. उपुल थरंगाने 90 चेंडूंत 119 धावांची खेळी केली; पण त्यांचा डाव 327 धावांवर संपुष्टात आला. 

डू प्लेसिसला दक्षिण आफ्रिकेकडून सर्वोच्च खेळीचा विक्रम करण्यासाठी तीन धावा कमी पडल्या. त्याने 141 चेंडूंत 16 चौकार आणि तीन षटकारांसह आपली खेळी सजविली. त्याला क्विंटॉन डी कॉक (55) आणि डीव्हिलर्स (64) यांची साथ मिळाली. 

आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी वेगवान खेळ केला. थरंगा आणि निरोशान डिकवेला (58) यांनी दहा षटकांतच संघाचे शतक झळकावले. दोघांनी 139 धावांची सलामी दिल्यावर थरंगाने नंतर कुशल मेंडीसच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 64 धावा जोडल्या. तेव्हा श्रीलंका विजयाचा यशस्वी पाठलाग करणार असेच वाटत होते.

पार्नेलने दोघांनाही बाद करून विजयातील अडसर दूर केला. यानंतर श्रीलंका संघाने 4.3 षटकांत 20 धावांत सहा गडी गमावले. पार्नेलने 58 धावांत 4 गडी बाद केले. 

संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 5 बाद 367
(डू प्लेसिस 185 -141 चेंडू, 16 चौकार, 3 षटकार, डी कॉक 55, डीव्हिलर्स 64, लाहिरू कुमारा 3-73, सचिथ पथिराणा 2-55) वि.वि. श्रीलंका 48.1 षटकांत 327 (उपुल थरंगा 119 -90 चेंडू, 11 चौकार, 7 षटकार, निरोशान डिकवेला 58 संदुन विराकोडी 58, वेन पार्नेल 4-58, प्रिटोरियस 2-55, रबाडा 2-50, ताहिर 2-76).

Web Title: South Africa Faf Du Plessis Sri Lanka ODI Cricket