डीन एल्गरचे शानदार शतक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

ड्युनेडीन - दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गर याने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी शानदार शतक केले. 36 धावांवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत त्याने 128 धावांची नाबाद खेळी केली. आफ्रिकेने 3 बाद 22 वरून दिवसअखेर 4 बाद 229 अशी सुस्थिती गाठली. एल्गरला तेंबा बावुमा याची चांगली साथ मिळाली आहे.

बावूमा 38 धावांवर नाबाद आहे. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचली आहे. त्याआधी नील वॅग्नरने पाच चेंडूमध्ये दोन विकेट घेतल्या. त्याने संघाच्या 19व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर हशीम अमलाचा (1) त्रिफळा उडविला, तर अखेरच्या चेंडूवर जेपी ड्यूमिनीला (1) बाद केले. ट्रेंट बोल्टने स्टीफन कूकला (3) बाद करून पहिले यश मिळवून दिले होते. बोल्टच्याच चेंडूवर यष्टिरक्षक बीजे वॉटलिंग याच्याकडून एल्गरचा झेल सुटला. कर्णधार फाफ डू प्लेसिसने 52 धावांची खेळी केली.

Web Title: south africa newzeland test cricket match