प्रेमासाठी पाकिस्तान ते आफ्रिका; ताहिरची अनोखी प्रेमकहाणी

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

ताहिरची प्रेम कहाणी खूप वेगळी आहे. ताहिरने प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत देशाची सीमा ओलांडली आणि पाकिस्तानातून थेट दक्षिण आफ्रिकेत पोहचला. 1998 मध्ये इम्रान ताहिर पाकिस्तानच्या अंडर-19 संघातून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला. त्यावेळी त्याची ओळख दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय वंशांच्या सुमैया दिलदारसोबत झाली आणि पुढे एकमेकांच्या प्रेमात पडले.

केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिर बांगलादेशविरुद्ध 100वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. आफ्रिकेकडून अशी कामगिरी करणारा तो 24 वा खेळाडू ठरला. त्याच्या गोलंदाजीशिवाय विकेट मिळाल्यानंतर अनोख्या पद्धतीनं जल्लोष करण्याबद्दल तो प्रसिद्ध आहे. या विश्वकरंडकानंतर तो निवृत्ती घेणार आहे. ताहिर मैदानावरील कामगिरीबरोबरच त्याच्या प्रेम काहाणीसाठीसुद्धा चर्चेत आहे.

ताहिरची प्रेम कहाणी खूप वेगळी आहे. ताहिरने प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत देशाची सीमा ओलांडली आणि पाकिस्तानातून थेट दक्षिण आफ्रिकेत पोहचला. 1998 मध्ये इम्रान ताहिर पाकिस्तानच्या अंडर-19 संघातून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला. त्यावेळी त्याची ओळख दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय वंशांच्या सुमैया दिलदारसोबत झाली आणि पुढे एकमेकांच्या प्रेमात पडले. सुमैयाच्या प्रेमात पडलेल्या इम्रानने दक्षिण आफ्रिकेत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2006 मध्ये इम्राननं सुमैयासोबत लग्न केलं तेव्हा त्याला दक्षिण आफ्रिकेचं नागरिकत्व मिळालं.

इम्रान ताहिरने सुरुवातील डॉल्फिन्स आणि नंतर टायटसकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर इम्रानला दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची संधी मिळाली. देशांतर्गत सामन्यातील कामगिरीच्या जोरावर 2011च्या वर्ल्ड कपआधी त्याची निवड भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी करण्यात आली. त्यात त्याला एकही सामना खेळता आला नाही. प्रेमासाठी देश सोडणाऱ्या या खेळाडूचा प्रवास चकीत करणारा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South African cricketer Imran tahir Love story