विराट रेड झोनमध्ये?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

‘कामगिरी कर; अन्यथा...’ बीसीसीआयकडून इशाऱ्याचे वृत्त

नवी दिल्ली - क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी हिरवा कंदील दाखवलेला असतानाही अनिल कुंबळे यांनी दिलेला राजीनामा आणि त्याचबरोबर पत्राद्वारे स्पष्ट केलेली भूमिका यामुळे बीसीसीआयलाही आता खडबडून जाग आली आहे. कामगिरी कर; अन्यथा कर्णधारपद सोड, असा इशारा बीसीसीआयने कोहलीला दिल्याचे वृत्त आहे.

‘कामगिरी कर; अन्यथा...’ बीसीसीआयकडून इशाऱ्याचे वृत्त

नवी दिल्ली - क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी हिरवा कंदील दाखवलेला असतानाही अनिल कुंबळे यांनी दिलेला राजीनामा आणि त्याचबरोबर पत्राद्वारे स्पष्ट केलेली भूमिका यामुळे बीसीसीआयलाही आता खडबडून जाग आली आहे. कामगिरी कर; अन्यथा कर्णधारपद सोड, असा इशारा बीसीसीआयने कोहलीला दिल्याचे वृत्त आहे.

कुंबळे यांच्यावर राजीमान्यासाठी दडपण वाढवण्यास कोहलीला जबाबदार धरण्यात येत आहे. त्यामुळे कोहलीने रोष ओढवून घेतला आहे. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने कोहलीलाच आता इशारा दिल्याचे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. 

कुंबळे आणि कोहली यांचे नाते जुळले नसले तरी, गेल्या वर्षभरात भारताने मायदेशात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेशविरुद्धच्या मालिका जिंकल्या होत्या. चॅंपियन्स स्पर्धेच्याही अंतिम फेरीत धडक मारली होती. चॅंपियन्स स्पर्धेसाठी संघ रवाना होत असताना बीसीसीआयने कुंबळे यांचा वर्षभराची मुदत संपत असल्यामुळे नव्या प्रशिक्षपदासाठी अर्ज मागवले आणि तेथूनच कुंबळे-कोहली वाद प्रसिद्धिमाध्यमांसमोर येण्यास सुरवात झाली होती.

कुंबळे-कोहली यांच्यात विसंवाद असला तरी, भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर चॅंपियन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली होती. अंतिम लढतीतही संघ नियोजन बैठकीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, नाणेफेक जिंकल्यावर ऐनवेळी कोहलीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले. या पराभवानंतरच ड्रेसिंगरूममध्ये कुंबळे यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्याचे समजते. या दोघांमधील वाद टोकाचा झालेला असला तरी, तेंडुलकर-गांगुली-लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने कुंबळे यांनाच प्राधान्य देत त्यांना मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ मिळताच कुंबळेने दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला आणि भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली. 

कोहलीही राजीनामा देणार होता?
दरम्यान, मुदतवाढ मिळाल्यानंतरही कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडले नसते तर कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देणार होता, असे वृत्त प्रसिद्ध होत आहे; परंतु यास दुजोरा मिळालेला नाही. कुंबळे यांच्याबरोबरचे संबंध आता तडजोडीच्या पलीकडे गेले आहेत, असे कोहलीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे बोलले जात होते. तरीही बीसीसीआय आणि सल्लागार समिती या दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी प्रयत्नशील होती.

Web Title: sporst news virat kohli in red zone