esakal | शास्त्रींना 3 महिन्यांत मानधनापोटी मिळाले 2 कोटी 2 लाख
sakal

बोलून बातमी शोधा

शास्त्रींना 3 महिन्यांत मानधनापोटी मिळाले 2 कोटी 2 लाख

शास्त्रींना 3 महिन्यांत मानधनापोटी मिळाले 2 कोटी 2 लाख

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - खेळाडू, प्रशिक्षक आणि राज्य संघटना यांना ऑक्‍टोबर महिन्यातील देण्याची रक्कम बीसीसीआयने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. त्यानुसार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना तीन महिन्यांचे दोन कोटी रुपये मानधनापोटी देण्यात आले आहे; तर इंग्लंडमधील चॅंपियन्स करंडक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या भारतीय संघातील खेळाडूंना प्रत्येकी ३८.६७ लाख मिळाले आहेत.

नाट्यमय घडामोडींनंतर अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि नव्याने होणाऱ्या नियुक्तीतून माघार घेतल्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांचा मार्ग मोकळा झाला होता. शास्त्री यांचे नेमके मानधन जाहीर झाले नसले, तरी त्यांना १८ ऑक्‍टोबर २०१७ ते १७ जानेवारी २०१८ या तीन महिन्यांसाठी २ कोटी २ लाख ५० हजार रुपये देण्यात आले आहेत, तर शास्त्री यांच्या टीममधील गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण यांना १५ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीचे २६ लाख ९९ हजार ९९९ रुपये देण्यात आले.

२५ लाखांवरील देयकाची माहिती बीसीसीआयच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. चॅंपियन्स स्पर्धेसाठी संघातील प्रत्येक खेळाडूला ३८ लाख ६७ हजार देण्यात आले. त्याचबरोबर राज्य संघटनांचीही देणी देण्यात आली. हे सर्व करत असताना बीसीसीआयने ५७ कोटी ५७ लाख ७५५ रुपयांचा जीएसटी आणि २ कोटी २९ लाख ६७ हजारांचा सेवाकर भरला आहे.

बीसीसीआयने भरलेला कर
जीएसटी (सप्टेंबर) - ५७ कोटी ५७ लाख ४८ हजार ७५५ 
प्राप्तीकर टीडीएस (सप्टेंबर) - ८ कोटी, २७ लाख, १ हजार ६१४
सेवाकर (हैदराबाद संघटना) - २ कोटी २९ लाख, ६७ हजार ६५९