...तर दूर होणेच चांगले - अनिल कुंबळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

कर्णधार विराट कोहलीबरोबर असलेले कुंबळेंचे प्रशिक्षकाचे नाते ताणल्यामुळे अखेर तुटलेच. यात अनिल कुंबळे यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला लिहिलेले पत्र...

कर्णधार विराट कोहलीबरोबर असलेले कुंबळेंचे प्रशिक्षकाचे नाते ताणल्यामुळे अखेर तुटलेच. यात अनिल कुंबळे यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला लिहिलेले पत्र...

मला मुख्य प्रशिक्षकपदावर कायम राहण्यास सांगून क्रिकेट सल्लागार समितीने माझ्यावर जो विश्‍वास दाखवला त्याबद्दल मी आभारी आहे. गेल्या वर्षभरातील संघाच्या यशाचे श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ, मार्गदर्शक तसेच सपोर्ट स्टाफला आहे. 

माझ्या शैलीविषयी तसेच प्रशिक्षकपदी कायम राहण्याविषयी कर्णधारास काही आक्षेप असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाने काल (ता. १९) मला प्रथमच सांगितले. हे ऐकल्यावर मला धक्काच बसला. कर्णधार तसेच मार्गदर्शकांच्या कामाची कक्षा मी जाणतो. कर्णधार आणि माझ्यातील गैरसमज दूर करण्याचा भारतीय क्रिकेट मंडळाने प्रयत्न केला, पण आमच्यातील भागीदारी संपुष्टात आली असल्याचे मी जाणले. त्यामुळेच मी यापासून दूर होण्याचे ठरवले.

व्यावसायिकता, शिस्त, संघाशी बांधिलकी, प्रामाणिकता, पूरक कौशल्य तसेच प्रत्येक मताचा आदर या महत्त्वाच्या गोष्टींना मी कायम महत्त्व दिले. एकमेकांच्या सहकार्यासाठी या गोष्टी आवश्‍यक आहेत. कामगिरीत सुधारणा होण्यासाठी खेळाडूंसमोर आरसा धरण्याचे काम मार्गदर्शकाचे असते.

आता माझ्याबाबत काही आक्षेप असताना मार्गदर्शकपदाची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समिती तसेच भारतीय क्रिकेट मंडळाने योग्य वाटेल अशा व्यक्तीकडे सोपवणेच उचित ठरेल. 

गेले एक वर्ष भूषवलेले मुख्य प्रशिक्षकपद हा माझ्यासाठी एक सन्मानच होता. त्याबद्दल क्रिकेट सल्लागार समिती, भारतीय मंडळ, क्रिकेट प्रशासकीय समिती तसेच सर्वांचा आभारी आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या असंख्य चाहत्यांचेही मी आभार मानतो. माझ्या देशातील क्रिकेटच्या महान परंपरेचा मी कायम शुभचिंतक राहीन.

Web Title: sports news anil kumble talking