वेंगर यांना दोन वर्षे मुदतवाढ

पीटीआय
बुधवार, 31 मे 2017

लंडन - आर्सेनलने प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांच्याबरोबरील करार दोन वर्षांनी वाढविला आहे. त्यामुळे त्यांचा आर्सेनलबरोबरील सहवास २१ वर्षांचा होईल. वेंगर आणि क्‍लबचे मालक स्टॅन क्रोएन्के यांची सोमवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. यंदाच्या प्रीमियर लीगमध्ये आर्सेनलला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. १९९६ मध्ये फ्रान्सचे वेंगर दाखल झाल्यापासून ‘टॉप फोरब’मध्ये आर्सेनलला प्रथमच स्थान मिळू शकले नाही. यानंतर एफए कप जिंकून आर्सेनलने भरपाई केली. चेल्सीवरील विजय चाहत्यांसाठी सुखद ठरला. वेंगर यांनी पहिल्या नऊ मोसमांत आर्सेनलला तीन प्रीमियर लिग करंडक आमि चार एफए कप जिंकून दिले होते.

Web Title: sports news Arsène Wenger

टॅग्स