अॅशेस: ऑस्ट्रेलियाचा 120 धावांनी विजय; स्टार्कचे 5 बळी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 December 2017

ऍडलेड : दुसऱ्या अॅशेस कसोटीत आज (बुधवार) पाचव्या दिवशी दोन्ही संघांना समान संधी असताना मिशेल स्टार्कच्या वेगवान माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ 233 धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

ऍडलेड : दुसऱ्या अॅशेस कसोटीत आज (बुधवार) पाचव्या दिवशी दोन्ही संघांना समान संधी असताना मिशेल स्टार्कच्या वेगवान माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ 233 धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसन याच्या पाच विकेट आणि कर्णधार रुटच्या नाबाद अर्धशतकामुळे प्रकाशझोतातील कसोटीत इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधण्याची संधी इंग्लंडकडे होती. त्यांनी ३५४ धावांच्या आव्हानासमोर ४ बाद १७६ धावा अशी सुरवातही केली. इंग्लंडला आज पाचव्या दिवशी इंग्लंडला १७८ धावांची गरज होती. पण, जोश हेझलवूडने रुटला बाद करत विजयातील मोठा अडसर दूर केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना जास्त वेळ खेळपट्टीवर टीकू दिले नाही. अखेर इंग्लंडचा दुसरा डाव 233 धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने 120 धावांनी विजय मिळविला. स्टार्कने दुसऱ्या डावात 5 बळी मिळविले.

तत्पूर्वी, चौथ्या दिवशी ४ बाद ५३ वरून ऑस्ट्रेलियाचा डाव १३८ धावांत संपला होता. वोक्‍सने चार विकेट टिपल्या. कांगारूंनी द्विशतकी आघाडीनंतरही इंग्लंडला फॉलोऑन दिला नव्हता. दुसऱ्या डावात त्यांची ७ बाद ९० अशी स्थिती झाली होती, पण कांगारूंचे शेपूट इंग्लंडसाठी पुन्हा डोकेदुखी ठरले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया - ८ बाद ४४२ घोषित व ५८ षटकांत सर्वबाद १३८ (डेव्हिड वॉर्नर १४, उस्मान ख्वाजा २०, स्टीव स्मिथ ६, नेथन लायन १४, शॉन मार्श १९, मिचेल स्टार्क २०, जेम्स अँडरसन ५-४३, क्रेग ओव्हर्टन १-११, ख्रिस वोक्‍स ४-३६) विजयी विरुद्ध इंग्लंड २२७ व सर्वबाद 233 (ऍलिस्टर कुक १६, मार्क स्टोनमन ३६, ज्यो रूट ६७, डेविड मलान २९, स्टार्क 5-88, लायन 2-45).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Ashes Series Mitchell Starc completes a five-wicket haul to seal a 120-run win for Australia