मार्शच्या शतकाने ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 December 2017

ॲडलेड - शॉन मार्शच्या नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रकाशझोतातील ॲशेस कसोटीवर पकड मिळवली आहे. ४४२ धावांची मोठी धावसंख्या उभारताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा एक फलंदाज २९ धावांत बाद केला.

ॲडलेड - शॉन मार्शच्या नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रकाशझोतातील ॲशेस कसोटीवर पकड मिळवली आहे. ४४२ धावांची मोठी धावसंख्या उभारताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा एक फलंदाज २९ धावांत बाद केला.

पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला ४ बाद २०९ एवढीच मजल मारता आली होती. त्यामुळे इंग्लंड गोलंदाजांच्या आशा मावळल्या नव्हत्या. आज ७ बाद ३११ अशी अवस्था केल्यानंतरही इंग्लिश गोलंदाजांना आशेचा किरण दिस होता; परंतु शॉन मार्शने १२५ धावांची नाबाद खेळी करून त्यांना बॅकफूटवर टाकले. नवव्या क्रमांकाचा फलंदाज पॅट कमिन्सने ४४ धावांची खेळी करून त्यांच्या जखमेवर मिठ चोळले. त्याअगोदर मार्श आणि टीम पेन यांनी ९५ धावांची भागीदारी केली. 

संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया, प. डाव - ८ बाद ४४२ घोषित (डेव्हिड वॉर्नर ४७, उस्मान ख्वाजा ५३, स्टिव स्मिथ ४०, शॉन मार्श नाबाद १२६, टीम पेन ५७, पॅट कमिन्स ४४, स्टुअर्ट ब्रॉड २-७२, ओव्हरटन ३-१०५). इंग्लंड, प. डाव ः १ बाद २९ (कूक खेळत आहे ११)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ashes test cricket competition