द्विशतकी आघाडीनंतर कांगारूंची घसरगुंडी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 December 2017

ॲडलेड - प्रकाशझोतातील ॲशेस कसोटीने तिसऱ्या दिवशी नाट्यमय वळण घेतले. मालिकेतील या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी एकूण १३ विकेट पडल्या. त्यामुळे कसोटी नाट्यमय वळणावर येऊन ठेपली आहे.

१ बाद २९ वरून इंग्लंडचा पहिला डाव २२७ धावांत आटोपला. २१५ धावांच्या आघाडीनंतर मात्र कांगारूंची दिवसअखेर ४ बाद ५३ अशी घसरगुंडी उडाली. यानंतरही कांगारू २६८ धावांनी पुढे आहेत.

इंग्लंडचा निम्मा संघ १०२ धावांत गारद झाला होता. त्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टॉ तसेच वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्‍स आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रतिकार केला. बेअरस्टॉ-वोक्‍स यांनी ६६ धावांची भागीदारी रचली. नवव्या क्रमांकावर उतरलेला ओव्हर्टन ४१ धावांवर नाबाद राहिला. त्याची कामगिरी इंग्लंडसाठी डावात सर्वोत्तम ठरली. लायनने चार विकेटसह छाप पाडली. यात सर्वाधिक अनुभवी कूकच्या विकेटचा समावेश होता.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भेदक मारा केला. अँडरसनने सलामीवीर कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट (४) आणि ख्वाजा हे दोन मोहरे टिपले. वोक्‍सने वॉर्नर आणि स्मिथ (६) यांचा अडथळा दूर केला. दिवसअखेर हॅंडसकाँब (३) आणि नाईटवॉचमन लायन (३) नाबाद होते.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ८ बाद ४४२ घोषित व ४ बाद ५३ (डेव्हिड वॉर्नर १४, उस्मान ख्वाजा २०, जेम्स अँडरसन २-१६, ख्रिस वोक्‍स २-१३) विरुद्ध इंग्लंड ः ७६.१ षटकांत सर्वबाद २२७ (३७, मोईन अली २५, जॉन बेअरस्टॉ २१, ख्रिस वोक्‍स ३६, क्रेग ओव्हर्टन नाबाद ४१-७९ चेंडू, ५ चौकार, मिचेल स्टार्क ३-४९, पीटर कमिन्स २-४७, नेथन लायन ४-६०).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ashes test cricket competition