ऑस्ट्रेलियाचे बांगलादेशला चोख उत्तर

पीटीआय
Wednesday, 6 September 2017

चितगाव - ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या बांगलादेशने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात तीनशे धावांचा पल्ला पार केला. यात नॅथन लिऑनने सात गडी बाद करून बांगलादेशला रोखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर व पीटर हॅण्डस्कोम्ब यांनी संयमी फलंदाजी करीत १२७ धावांची नाबाद भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थिती गाठून दिली. ऑस्ट्रेलिया संघ अजूनही ८० धावांनी पिछाडीवर असला तरी वॉर्नर व हॅण्डस्कोम्ब यांचा खेळ पाहता तिसऱ्या दिवशी बांगलादेशला विकेट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल. 

सकाळी खेळाला सुरुवात झाली, त्यावेळी पहिल्याच षटकांत लिऑनने मुशफिकूर रहीमला टिपले. ताईजूल इस्लामला बाद करून लिऑनने सहा वर्षांत तिसऱ्यांदा कसोटीत सात गडी बाद करण्याची किमया केली. ॲश्‍टोन अगरने दोन गडी बाद केले. मेहदी मिराजला वॉर्नरने अचूक फेकीवर धावबाद केले. ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशजनक झाली. उपाहारानंतर काही मिनिटांतच मॅट  रेनशॉ तंबूत परतला. मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर उचलून मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षक रहिमच्या हाती गेला. वॉर्नर आणि स्टीव स्मिथने ९३ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताईजूल इस्लामच्या एका सरळ चेंडूवर स्मिथचा त्रिफळा उडाला आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. 

धावफलक - बांगलादेश पहिला डाव (६ बद २५३ वरून पुढे) मुशफिकूर रहीम त्रि. गो. लिऑन ६८, नासीर हुसेन झे. वाडे गो. अगर ४५, मेहदी हसन मिराज धावबाद ११, ताईजुल इस्लाम झे. स्मिथ गो. लिऑन ९, मुस्तफिजूर रहमान नाबाद ००, अवांतर ५, एकूण सर्वबाद ३०५.  बाद क्रम - १-१३, २-२१, ३-७०, ४-८५, ५-११७, ६-२२२, ७-२६५, ८-२९३, ९-२९६, १०-३०५.

गोलंदाजी - पॅट कमिन्स २२-५-४६-०, नॅथन लिऑन ३६.२-७-९४-७, स्टीव ओ किफी २३-०-७९-०, ॲश्‍टोन अगर २३-९-५२-२, ग्लेन मॅक्‍सवेल ४-०-१३-०, हिल्टन कार्टराईट ५-१-१६-०. 

ऑस्ट्रेलिया पहिला डाव - मॅट रेनशॉ झे. मुशफिकूर गो. रहमान ४, डेव्हिड वॉर्नर खेळत आहे ८८, स्टीव स्मिथ त्रि.गो. ताईजूल इस्लाम ५८, पीटर हॅण्डस्कोम्ब खेळत आहे ६९, अवांतर ६, एकूण २ बाद २२५. बाद क्रम - १-५, २-९८.

गोलंदाजी - मेहदी हसन मिराज २०-२-५३-०, मुस्तफिजूर रहमान १०-०-४५-१, शाकीब अल हसन १५-०-५२-०, ताईजूल इस्लाम १५-१-५०-१, नासीर हुसेन १-०-४-०, मोमीनूल हक २-०-६-०, सब्बीर रहमान १-०-९-०.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news australia Bangladesh cricket