esakal | 'अॅशेस' ऑस्ट्रेलियाकडे; इंग्लंडचा मालिकेत 4-0 ने धुव्वा
sakal

बोलून बातमी शोधा

Ashes Series

आज पाचव्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटला आजारपणाने बाहेर जावे लागल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव आज (सोमवार) अखेरच्या दिवशी संपुष्टात आणला. इंग्लंडला दुसऱ्या डावात 180 धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चोख कामगिरी पार पाडली.

'अॅशेस' ऑस्ट्रेलियाकडे; इंग्लंडचा मालिकेत 4-0 ने धुव्वा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सिडनी - शॉन आणि मिशेल मार्श बंधूंच्या शतकानंतर नॅथन लियॉन आणि पॅट कमिन्सच्या गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि 123 धावांनी पराभव करत पाचव्या कसोटीत विजय मिळविला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत इंग्लंडचा 4-0 असा धुव्वा उडविला. 

आज पाचव्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटला आजारपणाने बाहेर जावे लागल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव आज (सोमवार) अखेरच्या दिवशी संपुष्टात आणला. इंग्लंडला दुसऱ्या डावात 180 धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चोख कामगिरी पार पाडली. त्यापूर्वी, चौथ्या दिवशी शॉन मार्श (१७१) आणि मिशेल मार्श (१०१) यांनी शतके झळकावून ऑस्ट्रेलियाची आघाडी मिळवून दिली होती. ऑस्ट्रेलियाने रविवारी चौथ्या दिवशी दुसरा डाव ७ बाद ६४९ धावसंख्येवर घोषित केला. पहिल्या डावात ३०३ धावांनी पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडची दिवस अखेरीस ४ बाद ९३ अशी अवस्था झाली होती. कर्णधार ज्यो रूट ४२, तर जॉनी बेअरस्टॉ १७ धावांवर खेळत होता. पण, ज्यो रुट आजारपणामुळे खेळू शकला नाही.

दोन दिवस कडक उन्हात क्षेत्ररक्षण करताना थकून गेलेल्या इंग्लंडची दुसऱ्या डावातही पडझड झाली. मिशेल स्टार्कने सुरवातीलाच मार्क स्टोनमनची विकेट मिळवली. स्टोनमनने ‘रेफरल’ची मागणी केली. तिसऱ्या पंचांनी निर्णय कायम ठेवल्यामुळे इंग्लंडला एका रिव्ह्यूची संधी गमवावी लागली.

पुढच्याच षटकातील पहिल्या चेंडूवर अॅलिस्टर कूकला जीवदान मिळाले; पण त्याचा फायदा उठवण्यात त्याला अपयश आले. लियॉनने त्याचा त्रिफळा उडवला. बाद होण्यापूर्वी दुसरी धाव घेऊन कूकने कसोटी कारकिर्दीमधील बारा हजार धावांचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये बारा हजार धावा करणारा तो सहावा फलंदाज ठरला. कूकपाठोपाठ लियॉनने डेविड मलानचीही शिकार केली. लियॉनने जेम्स व्हिन्सचीही विकेट मिळवली. मात्र, ‘रेफरल’मुळे त्याला जीवदान मिळाले. त्यानंतर आणखी तीन धावांची भर घातल्यावर तो कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ४ बाद ९३ धावा झाल्या असून, ते अजून २१० धावांनी पिछाडीवर आहेत.

त्यापूर्वी मार्श बंधूंच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाची आघाडी मजबूत झाली. शतक झळकाविल्यावर मिशेल (१०१) लगेच बाद झाला. त्याने १४१ चेंडूंत १५ चौकार आणि दोन षटकार लगावले. शॉन मार्श उपाहारानंतर स्टोनमनच्या थेट फेकीने धावबाद झाला. त्याने ४०३ मिनिटांत २९१ चेंडूंत १८ चौकारांच्या साहाय्याने १५६ धावा केल्या. शॉन बाद झाल्यावर स्टार्क (११), टीम पेनी (३८), पॅट कमिन्स (२४) यांनी ऑस्ट्रेलियाची आघाडी वाढवली. 

पर्थ येथील ४२ अंश सेल्सिअस तापमानात जेम्स अँडरसनची गोलंदाजी लक्षात राहिली. त्याने ३४ षटकांत एकच गडी बाद केला असला तरी, त्याने केवळ ५६ धावा दिल्या. इंग्लंडच्या मोईन अली आणि मॅसन क्रेन ही फिरकी जोडी महागडी ठरली. या दोघांनी मिळून ३६३ धावा दिल्या. 

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड ३४६ आणि सर्वबाद 180 पराभूत वि. ऑस्ट्रेलिया ७ बाद ६४९ घोषित (ख्वाजा १७१, शॉन मार्श १५६, मिशेल मार्श १०१, डेव्हिड वॉर्नर ५६, स्टीव स्मिथ ८३, मोईन अली २-१७०).

ऑस्ट्रेलियाची भावांची तिसरी जोडी
कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात शतक झळकाविण्याची अनोखी कामगिरी शॉन आणि मिशेल मार्श बंधूंनी केली. अशी कामगिरी करणारी ऑस्ट्रेलियाची ही तिसरी जोडी ठरली. यापूर्वी १९७२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ग्रेग आणि इयान चॅपेल, तर मार्क आणि स्टीव वॉ यांनी २००१ मध्ये इंग्लंडविरुद्धच अशी कामगिरी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात भावांनी शतक करण्याची ही आठवी वेळ ठरली.

loading image