ऑस्ट्रेलियाचा आणखी एक मोठा पराभव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

दक्षिण आफ्रिकेचा ४९२ धावांनी दणदणीत विजय; फिलँडरचा भेदक मारा
जोहान्सबर्ग - वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलॅंडरच्या भेदक गोलंदाजीपुढे चौथ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा प्रतिकार बोथट ठरला. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४९२ धावांनी विजय मिळविला. चार सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिकेने ३-१ जिंकली.

अखेरच्या दिवशी झालेल्या ८३ मिनिटांच्या खेळात फिलॅंडरचा तिखट माराच लक्षात राहिला. त्याने सर्वोत्तम कामगिरी करताना २१ धावांत ६ गडी बाद केले. याहीपेक्षा विशेष म्हणजे फिलॅंडरने आज ३२ चेंडूत केवळ ३ धावा देत सहा गडी बाद केले. निवृत्तीच्या दिवशी मॉर्केलला मात्र गडी बाद करता आला नाही.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११९ धावांतच आटोपला. चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणी उद्‌ध्वस्त झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंकडून थोडा तरी प्रतिकार अपेक्षित होता. पण, नाणेफेक हरल्यापासून त्यांच्या अपयशास सुरवात झाली ती पराभवापर्यंत कायम राहिली.

ऑस्ट्रेलियाचा पराभव
 १९७० नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा द. आफ्रिकेत मालिका पराभव
 धावांच्या फरकाने दुसरा तर एकुणात चौथा मोठा पराभव
 यापूर्वी इंग्लंडविरुद्ध १९२८मध्ये ६७५ धावांनी
 अखेरच्या दिवशी केवळ ८३ मिनिटे धरला टिकाव
 फिलॅंडरच्या ३२ चेंडूंत ३ धावांत ६ विकेट्‌स

संक्षिप्त धावफलक 
दक्षिण आफ्रिका ४८८ आणि ६ बाद ३४४ घोषित वि.वि. ऑस्ट्रेलिया २२१ आणि ११९ (पीटर हॅंड्‌सकोम्ब २४, ज्यो बर्न्स ४२, फिलॅंडर ६-२१, मॉर्केल २-२८)

Web Title: sports news australia south africa test cricket match