ऑस्ट्रेलियाला दणका

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

केप टाऊन - यश मिळविण्यासाठी चेंडू कुरतडण्यासारख्या अखिलाडूवृत्तीचा आधार घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशीच दक्षिण आफ्रिका संघाने ३२२ धावांनी दणका दिला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. 

विजयासाठी ४३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव चौथ्या दिवशी अखेरच्या एका सत्रात १०७ धावांत संपुष्टात आला. मॉर्ने मॉर्केलने २३ धावांत ५ गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. मॉर्केलने सामन्यात ११० धावांत ९ गडी बाद केले. 

त्यापूर्वी, चेंडू कुरतडल्याप्रकरणी होत असलेल्या टिकेने ड्रेसिंगरुममधूनच हताश झालेले ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव झटपट गुंडाळू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३७३ धावा करून त्यांच्यासमोर विजयासाठी ४३० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना बॅंक्रॉफ्ट आणि वॉर्नर यांनी चहापानापूर्वीचा ७० मिनिटांचा वेळ खेळून काढला; पण अखेरच्या सत्रात त्यांच्यासमोर जणू पराभव वाढून ठेवला होता. बॅंक्रॉफ्ट धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव ९९ मिनिटांत १९.३ षटकांत ५० धावांची भर घालून आटोपला.

स्मिथ, वॉर्नरवर आयुष्यभराची बंदी ?
याच कसोटी सामन्यात चेंडू कुरतडण्याप्रकरणी आयसीसीने ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टीव्ह स्मिथवर एका सामन्यासाठी निलंबित केले असले, तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया स्मिथ, वॉर्नरवर स्वतंत्र कारवाई करण्याचा विचार करत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेनुसार अशा प्रकारच्या आरोपात त्यांच्याकडे आयुष्यभराच्या बंदीचा प्रस्ताव आहे. मात्र, चौकशी समितीचा अहवाल आल्यावरच याविषयी अंतिम निर्णय होईल.

दक्षिण आफ्रिका ३११, ३७३ (मार्करम ८४, डिव्हिलर्स ६३, डी कॉक ६५, फिलॅंडर ५२, हेझलवूड ३-६९, कमिन्स ३-६७, लियॉन ३-१०२) वि.वि. ऑस्ट्रेलिया २५५, १०७ (वॉर्नर ३२, बॅंक्रॉफ्ट २६, मॉर्केल ५-२३)

Web Title: sports news australia vs south africa