तिरंगी टी-२० क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलिया विजेता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 February 2018

ऑकलंड - ऑस्ट्रेलियाने तिरंगी टी- २० मालिकेत विजेतेपद मिळविले. न्यूझीलंडविरुद्ध  अंतिम सामना पावसामुळे अर्धवट राहिल्यानंतर वेळी डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे कांगारू १९ धावांनी जिंकले.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात दोन वेळा पावसाने व्यत्यय आणला. दुसऱ्यांदा व्यत्यय आला तेव्हा १४.४ षटकांत ३ बाद १२१ धावा केल्या होत्या. पुढे खेळच होऊ शकला नाही. डकवर्थ-लुईस नियमानुसार तेवढ्या षटकांत १०३ धावांचे आव्हान आले. ऑस्ट्रेलियाने १२१ धावांची मजल मारली होती. त्यामुळे त्यांना १९ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. 

संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड २० षटकांत ९ बाद १५० (रॉस टेलर ४३, ॲश्‍टन ॲगर ३-२७) पराभूत वि. १४.४ षटकांत ३ बाद १२१ (सुधारित आव्हान १०३) (डीआर्सी शॉर्ट ५०, डेव्हिड वॉर्नर २५).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news australia win in t-20 cricket series