ऑस्ट्रेलिया पुन्हा पराभवाच्या छायेत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 April 2018

जोहान्सबर्ग - कारकिर्दीतला अखेरचा सामना खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मॉर्ने मॉर्केलच्या तडाख्याने ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या कसोटीतही पराभवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. विजयासाठी ६१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ८८ अशी झाली. 

अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. आता अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५२४ धावांची आवश्‍यकता आहे. त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव ६ बाद ३४४ धावांवर घोषित केला. कर्णधार डू प्लेसिसने कारकिर्दीमधील आठवे शतक साजरे करताना १२० धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक 
दक्षिण आफ्रिका ४८८ आणि ६ बाद ३४४ घोषित वि. ऑस्ट्रेलिया २२१ आणि ३ बाद ८८ (ज्यो बर्न्स ४२, हॅंडसकोम्ब खेळत आहे २३, शोन मार्श खेळत आहे ७ मॉर्केल २-१८).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news austrolia and south africa test cricket match