प्रशासन समिती-बीसीसीआय आज महत्त्वपूर्ण बैठक

पीटीआय
Wednesday, 9 August 2017

नवी दिल्ली - प्रशासन समिती आणि बीसीसीआयचे अधिकारी यांच्यात उद्या महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. यामध्ये ऑलिंपिकमधील क्रिकेटच्या समावेशाबाबत भारताची भूमिका, बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारातील अनियमितता, देशांतर्गत खेळाडूंच्या नवीन मानधन रचना अशा काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. 

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मानधनात २००७ नंतर वाढ झालेली नाही. आता यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. व्यावसायिक हितसंबंधांचा विषयही महत्त्वाचा ठरणार आहे. लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीच्या पार्श्‍वभूमीवर व्यावसायिक हितसंबंधांबरोबर आर्थिक व्यवहारातील अनियमितता हे कळीचे विषय ठरण्याची शक्‍यता आहे.

चर्चेतील काही विषय
२०२४ मधील पॅरिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करणे.
दौरानिश्‍चिती आणि देशांतर्गत स्पर्धा-मालिका कार्यक्रम निश्‍चित करणे.
व्यावसायिक हितसंबंध.
समालोचक निश्‍चित करणे.
आयपीएल २०१८.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news bcci cricket