‘बीसीसीआय’ त्रिकूट करा ‘आउट’ 

पीटीआय
Thursday, 17 August 2017

नवी दिल्ली - निर्देश दिलेले असूनही त्याची पूर्तता न केल्यामुळे सध्या बीसीसीआयच्या प्रशासनाची सूत्रे असलेले अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या तिघांनाही पदावरून दूर करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने केली आहे.

नवी दिल्ली - निर्देश दिलेले असूनही त्याची पूर्तता न केल्यामुळे सध्या बीसीसीआयच्या प्रशासनाची सूत्रे असलेले अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या तिघांनाही पदावरून दूर करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने केली आहे.

अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि सचिव पदावरून दूर करण्यात आल्यानंतर बीसीसीआयची सूत्रे सी. के. खन्ना (अध्यक्ष), अमिताभ चौधरी (सचिव) आणि अनिरुद्ध चौधरी (खजिनदार) यांच्याकडे आहेत. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास ते तिघेही पदाधिकारी टाळाटाळ करत असल्यामुळे त्यांनाही पदावरून बाजूला करावे, असा अहवाल प्रशासकीय समितीने सर्वोच्च न्यायालयाला दिला आहे.

या तिन्ही पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणणारा एकच मुद्दा या प्रशासकीय समितीने उपस्थित केला नाही तर तीन सर्वोच्च न्यायालयांच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून त्यांच्यामार्फत सर्व संलग्न संघटनांचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण करावे, अशीही मागणी केली आहे.

राज्य संघटना लोढा शिफारशींची अंमलबजावणी करण्यास उत्सुक नाही. बीसीसीआयच्या २६ जुलैला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यास सीईओ राहुल जोहरी यांना मज्जाव करण्यात आला आणि याच बैठकीत शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. ही विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे स्वकेंद्रित आणि परस्परांच्या हितसंबंधाची होती, असे आमच्या निदर्शनास आले असल्याचेही प्रशासकीय समितीने आपल्या अहवालत म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news bcci cricket