‘बीसीसीआय’ महाव्यवस्थापक श्रीधर यांचा राजीनामा

पीटीआय
Thursday, 28 September 2017

नवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशींनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) लागू झालेल्या नव्या नियमानुसार क्रिकेट महाव्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर यांची ‘विकेट’ पडली. त्यांनी गुरुवारी प्रशासक समितीकडे आपल्या महाव्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला. प्रशासक समितीने देखील तो स्वीकारल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी दिली आहे. 

वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीधर यांनी गेल्याच आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत काम पाहणार असल्याचे त्या वेळी स्पष्ट केले होते. प्रशासक समितीच्या आज ‘बीसीसीआय’ मुख्यालयात झालेल्या बैठकीत त्यांचा राजीनामा मान्य करण्यात आला. श्रीधर यांच्यावर परस्पर हितंसंबध जपल्याचा आरोप होता. हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असताना त्यांनी संघटनेशी संलंग्न असणाऱ्या काही क्‍लबची मालकी आपल्याकडे असल्याची माहिती लपविली होती. लोढा समितीच्या शिफरशीनुसार परस्पर हितसंबंध नियम कडक करण्यात आल्यावर ते चौकशीच्या घेऱ्यात अडकले होते. त्याच वेळी त्यांना बिनशर्त राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. 

श्रीधरन यांची नियुक्ती माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी केली होती. श्रीधर यापूर्वी हैदराबाद क्रिकेट संघटनेचे सचिवही होते. उपलब्ध माहितीनुसार हैदराबाद क्रिकेट संघटनेशी सलंग्न असलेल्या सहा क्‍लबबरोबर त्यांची भागीदारी होती. त्याचा उल्लेख त्यांनी कधीच उघडपणे केला नव्हता. हैदराबाद क्रिकेट संघटनेचे सध्याचे अध्यक्ष माजी ऑफ स्पिनर अर्षद अयूब यांनी ही माहिती प्रशासक समितीला दिली होती. तेव्हा पासून श्रीधर यांच्यावर प्रशासक समितीची बारीक नजर होती. 

श्रीधर यांच्या राजिनाम्यानंतर आता जोहरी ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट समितीचे प्रमुख म्हणून काम पाहतील. त्यांना सहायक म्हणून तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. 

यामध्ये मयांक परिक (आंतरराष्ट्रीय क्रिकेट), के.व्ही.पी. राव (देशांतर्गत क्रिकेट) आणि गौरव सक्‍सेना (आयसीसी-एसीसी कामकाज) यांचा समावेश करण्यात  आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news bcci Shridhar resigns