esakal | सीईओ जोहरींना अटकाव; लोढा शिफारशींना बगलच
sakal

बोलून बातमी शोधा

सीईओ जोहरींना अटकाव; लोढा शिफारशींना बगलच

सीईओ जोहरींना अटकाव; लोढा शिफारशींना बगलच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न

मुंबई/नवी दिल्ली - सीईओ राहुल जोहरी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली; पण त्यानंतर लोढा समितीच्या प्रमुख शिफारशींना विरोध करण्याची परंपरा कायम राखण्यात आली.

भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसाठी ७० वर्षांची वयोमर्यादा, पदाधिकाऱ्यांच्या कालावधीवरील बंधन, एक राज्य एक मत, त्रिसदस्यांची निवड समिती तसेच नऊ सदस्यांची कार्यकारी परिषद हे प्रमुख मुद्दे सोडत लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली. आम्ही पाच मुद्दे सोडल्यास लोढा समितीच्या शिफरशी मान्य केल्या आहेत, असे मंडळाचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले. 

बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांना कार्यकारिणी सदस्य नसल्याचे सांगत सभेस उपस्थित राहण्यास प्रतिबंध करण्यात आला. हाच निकष लावत पंजाब तसेच ओडिशा संघटनांच्या प्रतिनिधींनाही सभेस बसू दिले नाही. विशेष म्हणजे जोहरी या पूर्वींच्या विशेष सर्वसाधारण सभेस उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन आणि शहा यांनादेखील उपस्थित राहण्यास मनाई केली होती.  मात्र आज ते उपस्थित होते की नाही याविषयी कुठलीच माहिती उपलब्ध झाली नाही.

loading image