भारत अरुणच गोलंदाजीचे प्रशिक्षक होण्याचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नवी दिल्ली - प्रशासकीय समितीने सपोर्ट स्टाफ निवडण्याचे अधिकार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिलेले असल्यामुळे भारत अरुणच पुन्हा गोलंदाजीचे प्रशिक्षक होण्याचे संकेत मिळत आहेत. 

सल्लागार समितीने झहीर खान यांची ठराविक दौऱ्यांसाठी गोलंदाजीचा सल्लागार म्हणून निवड केली; परंतु ही समिती सपोर्ट स्टाफबाबत केवळ शिफारस करू शकते, असे स्पष्ट करण्यात आल्यामुळे आणि शास्त्री यांनी प्रशासकीय समितीला आपली आवश्‍यकता मांडलेली असल्यामुळे भारत अरुण यांना पसंती मिळण्याची शक्‍यता अधिक आहे.

शास्त्री यांनी आपला लंडन दौरा आटोपता घेऊन तातडीने मुंबई गाठले होते. त्यानंतर त्यांनी प्रशासक समितीची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत अरुण कसे योग्य आहेत हे प्रशासक समितीला पटवून दिले. झहीर संघाचे पूर्ण वेळ प्रशिक्षकपद भूषविण्यास उपलब्ध होणार नाही. अशा वेळी त्याच्या योजना समजावून घेऊन त्या गोलंदाजांकडून राबवून घेण्यासाठी अरुण यांच्यासारखा पूर्ण वेळच प्रशिक्षक हवा, असे शास्त्री यांनी प्रशासक समितीला पटवून दिल्याचे बोलले जात आहे. 

अनिल कुंबळे यांना प्रशिक्षक करताना क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांना नाकारले होते. विशेषतः सौरभ गांगुलीने शास्त्री यांना कडवा विरोध केला होता. त्यामुळे या वेळी पुन्हा शास्त्रींचे नाव समोर आल्यावर व्हायचा तो गोंधळ झाला. पण, गांगुली यांनी शास्त्रींच्या नावाला पसंती दिल्यावर गोलंदाजी आणि फलंदाजी प्रशिक्षकासाठी सल्लागार म्हणून झहीर आणि राहुल द्रविड यांचे नाव पुढे केले होते. मात्र, या वेळी शास्त्री यांनी क्रिकेट सल्लागार समितीवर पूर्ण कडी करून आपल्याला हवी तीच नियुक्ती पदरात पाडून घेतली, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news bharat arun bowling trainer