भारतच जिंकेल चँपियन्स करंडक : संगकारा

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

भारतीय संघ समतोल असल्याने तेच पुन्हा विजेतेपद मिळविण्यात यशस्वी ठरतील. या स्पर्धेत आशियातील चार संघ सहभागी आहेत. पण, भारतीय संघच मजबूत दिसत आहे.

लंडन - भारतीय क्रिकेट संघाकडे खऱ्या अर्थाने वेगवान गोलंदाजांचा सर्वोत्तम मारा आहे. त्यामुळे मला खात्री आहे, की भारतीय संघच पुन्हा चँपियन्स करंडक स्पर्धा जिंकेल, असे मत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा याने व्यक्त केले आहे.

इंग्लंडमध्ये 1 जूनपासून चँपियन्स करंडक स्पर्धेस सुरवात होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात मोहंमद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या या जलदगती गोलंदाजांचा संघात समावेश आहे. अश्विन आणि जडेजा यांच्या फिरकीमुळे भारतीय गोलंदाजीची धार आणखी वाढली आहे.

संगकारा म्हणाला, की भारतीय संघ समतोल असल्याने तेच पुन्हा विजेतेपद मिळविण्यात यशस्वी ठरतील. या स्पर्धेत आशियातील चार संघ सहभागी आहेत. पण, भारतीय संघच मजबूत दिसत आहे. आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर विराट नक्की चांगली करेल, असे मला वाटते. अश्विन आणि जडेजा यांच्यासोबत जलदगती गोलंदाजांची कामगिरी चांगली होत असल्याने हा संघ समतोल वाटतो. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
मॉन्सून आला रे! केरळच्या किनारपट्टीवर दाखल​
बारावीचा 89.50% निकाल; मुलींची बाजी​
'मोरा' चक्रीवादळाची बांगलादेशला धडक

गायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'
यूपीत मंत्र्यांकडून बारचे उद्घाटन; योगींनी मागितले स्पष्टीकरण
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी
लग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक
आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा​

Web Title: sports news Champions Trophy: 'India can retain title, pace attack has real firepower,' says Kumar Sangakkara