esakal | कसोटी क्रमवारीत पुजारा तिसरा
sakal

बोलून बातमी शोधा

कसोटी क्रमवारीत पुजारा तिसरा

कसोटी क्रमवारीत पुजारा तिसरा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दुबई - भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्‍वर पुजारा याने आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे. आयसीसीच्या वतीने गुरुवारी नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. पुजाराचे ८७३ गुण झाले आहेत. फलंदाजीत स्टीव्ह स्मिथ आघाडीवर आहे. गेली दोन वर्षे त्याने आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. स्मिथपाठोपाठ भारताचा विराट कोहली दुसऱ्या स्थानावर असून, दोघांमध्ये २५ गुणांचा फरक आहे. गोलंदाजीत भारताच्या रवींद्र जडेजा आणि अश्‍विन यांचे तिसरे, चौथे स्थान कायम आहे. जेम्स अँडरसन आघाडीवर, तर जोश हेझलवूड पाचव्या स्थानावर आहे. 

loading image