चर्चेपेक्षा सरावावर लक्ष केंद्रित - चेतेश्‍वर पुजारा

सुनंदन लेले
Wednesday, 3 January 2018

केपटाऊन - प्रतिस्पर्धी संघाची ताकद गोलंदाजीत आहे हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीचे ‘होम वर्क’ करूनच भारतीय संघाचा सध्याचा सराव सुरू आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ चेतेश्‍वर पुजाराने हे मान्य केले. प्रतिस्पर्धी संघ कसा आहे आणि त्यांची ताकद कशी याची चर्चा करण्यापेक्षा आम्ही सरावावर लक्ष केंद्रित केल्याचे पुजाराने सांगितले.

सराव सामना रद्द करून सरावावर भर देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य काम करत असल्याचे केपटाऊनच्या नितांत सुंदर न्यूलॅंड्‌स मैदानावर आल्यावर दिसून आले. सराव सामन्यात समोरच्या संघात मुद्दामहून कमजोर गोलंदाज दिले जातात तसेच खेळपट्टीत जान ठेवली जात नाही. मग सामन्यातून जे पाहिजे ते साध्य होत नाही. म्हणूनच भारतीय संघाने सराव सामना खेळणे टाळून सरावावर भर दिला. दक्षिण आफ्रिकेत पाऊल ठेवल्यापासून संघाने ८-९ सराव सेशन्स केले आहेत. दोन दिवस तर दिवसात दोन वेळा सराव केला गेला. 

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सरावाचे आणखी एक सत्र संपल्यावर भारतीय संघाच्या वतीने चेतेश्‍वर पुजाराने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘आमची तयारी उत्तम चालू आहे. सरावादरम्यान आखूड टप्प्याचा मारा खेळाची सवय करून घेत आहोत. मला वाटते की चांगल्या खेळपट्टीवर दर्जेदार गोलंदाजांना सामोरे जाताना चेंडू योग्य प्रकारे सोडणे हे सुद्धा फार महत्त्वाचे असते. मी २०११ आणि २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलेला आहे. त्या अनुभवाचा फायदा मला नक्‍की होईल.’’

पहिल्या कसोटी सामन्याची तयारी करताना आम्ही समोरच्या संघात कोण आहे आणि  कोण कसे खेळेल याकडे लक्ष देत नसल्याचे सांगून पुजारा म्हणाला, ‘‘आम्हाला काय करायचे आहे कसे खेळायचे आहे आणि योजना अमलात कशा आणायच्या याचा विचार चालू आहे. मला वाटते, की यंदाच्या दौऱ्यावर आलेल्या भारतीय गोलंदाजीत बरीच ताकद भरलेली आहे. खरे वेगवान गोलंदाज आपल्या संघात आहेत. या वेगवान गोलंदाजांमुळेच या वेळी संघाच्या कामगिरीला वेगळी धार येणार आहे.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cheteshwar pujara talking