बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ख्रिस गेलचे विक्रमी षटकार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 December 2017

ढाका - ख्रिस गेलने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये एका डावात सर्वाधिक १८ षटकारांचा विश्वविक्रम केला. रंगपूर रायडर्सकडून त्याने ढाका डायनामाईट्‌सविरुद्ध ६९ चेंडूंमध्ये १४६ धावांची नाबाद खेळी केली. त्याने पाच चौकारही मारले. याआधी त्यानेच २०१३च्या आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध १७५ धावांच्या नाबाद खेळीत १७ षटकार खेचले होते. रंगपूरने १ बाद २०६ धावा केल्या. ढाक्‍याला ९ बाद १४९ इतकीच मजल मारता आली. रंगपूरने ५७ धावांनी विजय मिळविला. गेलने या खेळीदरम्यान टी-२० मध्ये ११ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याचे हे विसावे शतक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news chris gayle six record in bangaladesh premier league