कथित फिक्‍सिंगच्या वृत्तामुळे खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 December 2017

पर्थ - तिसरी ॲशेस कसोटी आणि संपूर्ण मालिका फिक्‍स असल्याच्या कथित वृत्तामुळे काही काळ खळबळ माजली. आयसीसी तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी तातडीने इन्कार केल्यामुळे हे प्रकरण चहाच्या पेल्यातील वादळ ठरले. मुख्य म्हणजे यात सध्याच्या मालिकेत सहभागी झालेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूचा उल्लेख नाही.

‘दी सन’ या ब्रिटिश टॅब्लॉइडने हे वृत्त दिले होते. या वृत्तानुसार सोबर्स जोबान नामक बुकीने फिक्‍सिंग झालेल्या कालावधीचा तपशील देण्याची तयारी दर्शविली. तो मूळचा भारतीय असून, हिमाचल प्रदेशकडून वयोगट पातळीवर खेळला आहे. त्याचे टोपणनाव बिग मॅन असे आहे. आणखी एका बुकी तसेच आजी-माजी खेळाडूंचीही साथ असल्याचा दावा केला. 

‘आयसीसी’कडून इन्कार
या आरोपांची ‘आयसीसी’ने चौकशी सुरू केली आहे; पण प्राथमिक आढाव्यानुसार यात तथ्य असल्याच्या शक्‍यतेवर विश्वास ठेवणार नसल्याचे भ्रष्टाचारविरोधी पथकाचे सरव्यवस्थापक ॲलेक्‍स मार्शल यांनी स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियाकडून इन्कार
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे ‘सीईओ’ जेम्स सदरलॅंड यांनी स्पष्ट इन्कार केला. ते म्हणाले, की ‘कोणताही गंभीर आणि विश्वास ठेवण्यासारखा आरोप झाल्यास सखोल चौकशी करू; पण या आरोपात कोणताही पुरावा, तथ्य आणि समर्थनीय असे काहीच आढळले नाही. तिसरी कसोटी किंवा संपूर्ण ॲशेस मालिकेत भ्रष्ट प्रकार होत असल्याच्या शंकेत काहीही तथ्य नाही

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news confusion by fixing scandal