भारतीय खेळाडूंची ‘अशोक वाटिका’ भेट

Friday, 11 August 2017

कॅंडी - तीन कसोटी सामन्यांची मालिका यापूर्वीच खिशात टाकल्यामुळे श्रीलंकाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू काहिसे निवांत आहेत. कदाचित यामुळेच त्यांनी सरावाऐवजी विश्रांतीला पसंती दिली. अर्थात, ही विश्रांती सत्कारणी लावण्यासाठी संघातील काही मोजके खेळाडू यांनी पौराणिक महत्त्व असलेल्या रामायणातील ‘अशोक वाटिके’ला भेट दिली. 

सीतेचे हरण करून रावणाने तिला याच वाटिकेत ठेवले होते. तेव्हा या वाटिकेतील सीता मंदिराचेही त्यांनी दर्शन घेतेल. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, मसाजर अरुण कानडेसह क्रिकेटपटू लोकेश राहुल, महंमद शमी, उमेश यादव आणि अजिंक्‍य राहाणे यांनी या सहलीचा आनंद लुटला. कॅंडी ते नुवारा इलिया हा ८० किलोमीटरचा वळणावळणाचा रस्ता दोन तासांत पूर्ण करून खेळाडू अशोक वाटिकेत दाखल झाले. 

सीता मंदिराबरोबर रामभक्त हनुमानाच्या पावलांचेही त्यांनी दर्शन घेतले. हनुमानाच्या पावलांचा आकार बघून सगळेच थक्क झाले. रामायणाच्या पाऊलकुणा प्रत्यक्ष बघताना आम्हाला पुराण काळात हरवल्यासारखेच वाटले, अशी प्रतिक्रिया खेळाडूंनी व्यक्त केली. या निसर्ग सुंदर परिसराने सगळा शीण गेला असून, आता नव्या उत्साहाने तिसऱ्या कसोटीत उतरू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

भारतीय संघ आता उद्या शुक्रवारी पूर्ण सराव करणार आहे. शनिवारपासून (ता. १२) तिसऱ्या कसोटीस सुरवात होईल. आतापर्यंत कुठल्याच भारतीय संघाला परदेशात दौऱ्यात तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकता आलेली नाही. हा नवा इतिहास घडविण्यासाठी भारतीय खेळाडू उत्सुक आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket