esakal | आंतरराष्ट्रीय क्रिकेट निम्म्यावर?
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट निम्म्यावर?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट निम्म्यावर?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली / मुंबई - आम्ही सतत खेळत असतो, पूर्वतयारीस वावच नसतो. विश्रांतीही मिळत नाही, या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आक्षेपाची प्रशासकीय समितीने दखल घेतली असून, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत आंतरराष्ट्रीय लढतींचा कार्यक्रम निम्म्यावर आणण्याची तयारी दाखवली असल्याचे समजते.

मानधनात वाढ करण्यासाठी विराट कोहली मार्गदर्शक रवी शास्त्री; तसेच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यासह शुक्रवारी प्रशासकीय समितीस भेटणार आहे. त्या वेळी प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय आंतरराष्ट्रीय लढतींचे दिवस निम्म्यावर आणण्याचे आश्‍वासन देण्याची शक्‍यता आहे. सध्या भारतीय संघ एका वर्षात ५० सामने खेळतो, त्यामुळे १४० दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट होते. हा कालावधी ८० दिवसांपर्यंत कमी करण्याची तयारी राय यांनी दाखवली असल्याचे समजते. 

दक्षिण आफ्रिकेसारख्या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी पूर्वतयारीला वेळच नाही, हा आक्षेप कोहलीने घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धची ट्‌वेंटी-२० मालिका २४ डिसेंबरला संपणार आहे; तर भारतीय संघ २८ डिसेंबरला आफ्रिकेस रवाना होण्याची शक्‍यता आहे. ॲशेस पूर्वतयारीसाठी इंग्लंड संघ काही आठवडे अगोदर ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता; तसेच ते सराव सामनेही खेळले. त्याच वेळी कोहलीचा संघ आफ्रिकेत एकच दोनदिवसीय सराव सामना खेळणार आहे. 

loading image