ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला रोखले

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

कार्डिफ - सलामीचा फलंदाज तमिम इक्‍बालच्या जिगरबाज फलंदाजीनंतरही बांगलादेशाला चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आपल्या दुसऱ्या सामन्यात सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८२ धावांचीच मजल मारता आली. 

बांगलादेशाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तमिम इक्‍बाल वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. तमिम जोपर्यंत खेळपट्टीवर टिकून होता तोवर बांगलादेशाच्या धावा होत होत्या. तमिम बाद झाल्यावर त्यांचा डाव संपण्यासही वेळ लागला नाही. सलग दुसऱ्या शतकापासून तमिम दूरच राहिला. 

तमिमखेरीज बांगलादेशाकडून केवळ शकिब अल हसन आणि मेहदी हसन यानांच दोन आकडी मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने चार गडी बाद केले. यातील तीन बळी त्याने ४३व्या षटकांत मिळविले. स्टार्कला पूल करण्याच्या प्रयत्नांत तमिमचे टायमिंग चुकले आणि बॅटची कड घेऊन उडालेला झेल हेझलवूडने फाईन लेगला टिपला. त्यानंतर त्याच षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर स्टार्कने मश्रफी मुर्तझा आणि रुबेलस हुसेनला बाद केले. मुस्तफीझूरने स्टार्कची हॅटट्रिक हुकवली. त्यानंतर स्टार्कने आपल्या पुढच्याच षटकांत मेहदी हसनला बाद करून बांगलादेशाच्या डावाला पूर्णविराम दिला.

संक्षिप्त धावफलक
बांगलादेश ४४.३ षटकांत सर्वबाद १८२ (तमिम इक्‍बाल ९५ -११४ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, शकिब अल हसन २९, मेहदी हसन १४, मिशेल स्टार्क ४-२९, ॲडम झंम्पा २-१३)

Web Title: sports news cricket australia vs bangladesh